पोलिसांची ‘टिव टिव’ लाखाच्या घरात

By admin | Published: April 2, 2016 02:37 AM2016-04-02T02:37:50+5:302016-04-02T02:37:50+5:30

सोशल मीडियाच्या वाढत्या विस्तारात सायबर गुन्ह्यांत गुरफटत चाललेली तरुणाई, त्यातच दहशतवादी संघटनांच्या कारवाया यामुळे सायबर गुन्ह्यांना आळा घालणे हे एक आव्हान झाल्याने

The police's 'Tiv TV' in Lakhana's house | पोलिसांची ‘टिव टिव’ लाखाच्या घरात

पोलिसांची ‘टिव टिव’ लाखाच्या घरात

Next

- मनीषा म्हात्रे, मुंबई
सोशल मीडियाच्या वाढत्या विस्तारात सायबर गुन्ह्यांत गुरफटत चाललेली तरुणाई, त्यातच दहशतवादी संघटनांच्या कारवाया यामुळे सायबर गुन्ह्यांना आळा घालणे हे एक आव्हान झाल्याने तरुणाईला त्यांच्याच भाषेत समजविण्यासाठी मुंबई पोलीस नवनवीन तंत्रज्ञानाशी जोडले गेले. अद्ययावत वेबसाइटबरोबरच सुरू केलेल्या टिष्ट्वटर अकाउंटवरील फॉलोअर्सनी अवघ्या चार महिन्यांत गुरुवारी १ लाखाचा टप्पा पार केला.
डिसेंबर महिन्यात मुंबई पोलिसांच्या टिष्ट्वटर अकाउंटचा शुभारंभ करण्यात आला होता. तो सुरू होताच अवघ्या तासाभरात हजारो फॉलोअर्स जोडले गेले. नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता मुंबई पोलिसांनी या माध्यमातून जनजागृतीचा विडा उचलला. बाल कामगार, महिला सुरक्षा, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह, ज्येष्ठ महिला सुरक्षा, घरफोडी, चोरी अशा अनेक गुन्ह्यांबाबत त्यांनी टिष्ट्वटर अकाउंटच्या माध्यमातून जनजागृती केली. बाल कामगार, महिला सुरक्षा, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह, ज्येष्ठ महिला सुरक्षा, घरफोडी, चोरी अशा अनेक गुन्ह्यांबाबत त्यांनी टिष्ट्वटर अकाउंटच्या माध्यमातून जनजागृती केली.

अशी होते कारवाई
टिष्ट्वट्सचे गांभीर्य लक्षात घेताच याची माहिती वेब सेंटर हेड अश्विनी कोळी यांना दिली जाते. अवघ्या १४० कॅरेक्टरमध्ये त्यांची माहिती समजून त्यांना उत्तर देणे शक्य नसते. अशा वेळी सुरुवातीला त्या व्यक्तीचा वैयक्तिक क्रमांक मिळविला जातो.
संबंधित व्यक्तीशी संपर्क साधून संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकाची जोड करून दिली जाते. अनेकदा टिष्ट्वट्स करणारे स्वत:ची माहिती देण्यास टाळाटाळ करतात. अशा वेळी त्यांच्यापर्यंत मदत पोहोचविणे या टीमसमोर आव्हान असते.
त्यांची तक्रार समजून संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधल्यानंतर आलेल्या टिष्ट्वट्सवर उत्तर दिले जाते. यापैकी बऱ्याचशा टिष्ट्वट्सची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली जात असल्याचे अश्विनी कोळी यांनी सांगितले.

आयुक्तांचे अकाउंटही ६२ हजार पार
नागरिक आणि पोलीस यांना जोडण्यासाठी टिष्ट्वटर महत्त्वाचा दुवा ठरला आहे. नागरिकांनी केलेले टिष्ट्वट आणि त्यावर पोलिसांच्या त्वरीत मिळणाऱ्या प्रतिसादामुळे याच्या फॉलोअर्सने लाखाचा टप्पा पार केला आहे.
त्यात ३ हजार ३४१ टिष्ट्वट्स आणि २५३ जणांचे लाइक आहेत. तर दुसरीकडे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या अकाउंटनेही ६२ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. नागरिकांकडून मिळत असलेल्या या प्रतिसादामुळे मुंबई पोलिसांकडून त्यांचे आभार मानले आहेत.

टिष्ट्वटर अकाउंटवरील फॉलोअर्सनी अवघ्या चार महिन्यांत गुरुवारी
१ लाखाचा टप्पा पार केला.
१५८८तक्रारी या अकाउंटच्या माध्यमातून आतापर्यंत समोर आल्या आणि त्याचे निवारणही झाले. यात पार्किंग समस्येबरोबरच महिला अत्याचाराच्या तक्रारी, घरगुती वाद, आर्थिक व्यवहाराच्या तक्रारींचा समावेश होता. तर काहींच्या वायफळ टिष्ट्वटचा पोलिसांना वेळोवेळी
मनस्तापही सहन करावा लागताना दिसत आहे.

या दरम्यान पोलिसांचे हॅश टॅगही नागरिकांच्या पसंतीस उतरले. ‘बुरा ना बनो होली है’, ‘पोलीस को बताओ’, ‘से नो टू चाइल्ड लेबर’, ‘होश मे आओ’, ‘अलर्ट मुंबई सेफ मुंबई’, ‘जैसी करनी वैसी भरनी’, ’जनहित मे जारी’ असे अनेक हॅश टॅग चर्चेत आले होते.

या दरम्यान पोलिसांचे हॅश टॅगही नागरिकांच्या पसंतीस उतरले. ‘बुरा ना बनो होली है’, ‘पोलीस को बताओ’, ‘से नो टू चाइल्ड लेबर’, ‘होश मे आओ’, ‘अलर्ट मुंबई सेफ मुंबई’, ‘जैसी करनी वैसी भरनी’, ’जनहित मे जारी’ असे अनेक हॅश टॅग चर्चेत आले होते.

या टिष्ट्वटरची किर्ती परदेशात अडकलेल्या तरुणांपर्यंत पोहोचली. नोकरीच्या आमिषाला बळी पडून मलेशियातील जकार्तामध्ये अडकलेल्या वर्सोव्याच्या क्षितिज घाणेकर या तरुणाने टिष्ट्वटरवर आपली व्यथा मांडली आणि अवघ्या काही मिनिटांतच मुंबई पोलीसांनी त्याच्याशी संपर्क साधला.

आज हा तरुण मुंबई पोलिसांच्या या टिष्ट्वटर अकाउंटवरील मदतीमुळे घरी सुखरूप परतला. टिष्ट्वटरवरील मुंबई पोलिसांची भूमिका, त्यांच्या प्रतिसादामुळे तरुणाईचा पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालल्याचे दिसून येत आहे. तर घरबसल्या आॅनलाइन पोलीस ठाणेच उपलब्ध झाल्याची चर्चा मुंबईकरांमध्ये आहे.

Web Title: The police's 'Tiv TV' in Lakhana's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.