Join us

धोरण वादात; कमाई जोरात

By admin | Published: June 03, 2017 5:27 AM

कुलाबा येथील रहिवाशांकडून तीव्र विरोध सुरू असल्याने वाहनतळ धोरणाचा प्रयोग वादात सापडला आहे. मात्र

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कुलाबा येथील रहिवाशांकडून तीव्र विरोध सुरू असल्याने वाहनतळ धोरणाचा प्रयोग वादात सापडला आहे. मात्र, विरोधी वातावरणातही वाहनतळ शुल्काच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत गतवर्षीच्या तुलनेत पहिल्याच महिन्यात ९० टक्के उत्पन्न जमा झाले आहे.महापालिकेने वाहनतळांच्या नवीन धोरणावर १ एप्रिलपासून अंमलबजावणी सुरू केली. या धोरणाचा प्रयोग दक्षिण मुंबईतील १८ वाहनतळांपासून सुरू करण्यात आला. मात्र, रस्त्यावर पार्किंगसाठी शुल्क, इमारतींच्या प्रवेशद्वाराबाहेर पार्किंग, रात्रीचे पार्किंग शुल्क अशा संकल्पना आणल्या, परंतु विभागातील वाहनांची वर्दळ व त्या परिसराच्या महत्त्वानुसार पार्किंगचे दर ठरविण्यात आल्याने स्थानिकांनी विरोध सुरू केला. त्यामुळे हे धोरण वादग्रस्त ठरले आहे.नवे दर दामदुप्पट असूनही पार्किंग शुल्काच्या माध्यमातून पालिकेने एका महिन्यात ४० लाख कमावले. हेच उत्पन्न मार्च महिन्यात २१ लाख रुपये होते. शुल्कात मोठी वाढ होऊनही वाहनचालक विशेषत: मोटारसायकलस्वारांची वाहनतळांवर संख्या अधिक आहे. यापूर्वी वाहनतळांवर ठेकेदारांकडून होणाऱ्या लुटीची तक्रारही कमी झाल्याचे अधिकारी सांगतात.नवे धोरणमुंबईत ९२ वाहनतळे आहेत. ही संख्या तीनशेवर नेण्याचा प्रशासनाचा मानस आहे.दुचाकी वाहन उभे करण्यासाठी प्रति तास - ५ ते १५ रुपयेचारचाकीसाठी - २० ते ६० रुपयेतासाहून अधिक काळ वाहनतळावर वाहन राहिल्यास - पाच रुपयांच्या पटीत शुल्कवाढनिवासी वाहनतळ योजनेनुसार इमारतीबाहेरील रस्त्यावर दिवसा वाहन उभे करण्यासाठी ३,९६० रुपये, तर रात्रीच्या वेळेसाठी १,९८० रुपये.येथे झाली शुल्कवाढ फोर्ट बायलेन एरिया १ आणि २, वालचंद हिराचंद रोड १ आणि २, शिवसागर राम गुलाम मार्ग, पी. एम. रोड, रामजी कमानी (पश्चिम), रिगल सिनेमा, एम. जी. रोड (पश्चिम), बॉम्बे हॉस्पिटल, जे. एन. हरदिया मार्ग, रामजी कमानी (पूर्व), अदी मर्झबान रोड, एमजेपी मार्केट परिसर नंबर १, २ आणि ३, एम. जी. रोड , बद्रुद्दीन तय्यबजी मार्ग, नरोत्तम मोरारजी मार्ग, हुतात्मा चौक नंबर ३, इरॉस चित्रपटगृहासमोरील वाहतूक बेट, नाथीबाई ठाकरसी मार्ग