पश्चिम उपनगरात गुढी पाडव्यातून राजकीय ब्रँडिंग
By मनोहर कुंभेजकर | Published: April 9, 2024 07:20 PM2024-04-09T19:20:58+5:302024-04-09T19:21:07+5:30
सालाबादप्रमाणे या वर्षीही कांदिवली पूर्व येथील ठाकूर संकुलमध्ये "नववर्ष स्वागत समिती" तर्फे नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई-पश्चिम उपनगरात गुढी पाडव्यातून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता इच्छुक उमेदवारांनी आपले राजकीय ब्रँडिंग केले.यावेळी खासदार गजानन कीर्तिकर,शिवसेना नेते-आमदार सुनील प्रभू,उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे उमेदवार अमोल कीर्तिकर तसेच आमदार रवींद्र वायकर,आमदार अमित साटम, आमदार डॉ.भारती लव्हेकर तसेच माजी नगरसेवक त्यांच्या मतदार संघात विविध भागात काढलेल्या शोभायात्रेत आणि नव वर्ष कार्यक्रमात सहभागी झाले होते.
'दिंडोशी गुढी पाडवा शोभायात्रा' या हिंदू नवं वर्ष स्वागत यात्रेचे आयोजन सार्वजनिक रित्या सर्व मंडळ, संस्था,संघटना, राजकीय पक्ष असे सर्वांनी एकत्रित येऊन केले होते. नवीन म्हाडा सर्कल -छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संतोष नगर अशी ही शोभा यात्रा असून गुढी पूजन सकाळी ६ वाजता गणेश मंदिर,श्रीकृष्ण नगर येथे उभारली होती .तर यात्रा प्रारंभ सकाळी ७ वाजता झाला आणि असून समारोप दुपारी १२ वाजता झाला.
या शोभयात्रेची संकल्पना संकल्पना सुनिल थळे (कला दिग्दर्शक )आणि सीताराम मेस्त्री (कला दिग्दर्शक ) यांची असून त विभागातील सर्व संस्था आणि राजकीय पक्षांना एकत्रित आणून सर्व मिळून या शोभयात्रेचे आयोजन केले होते.
ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या.विविध हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवीणारे चलचित्र, ढोल ताशे पथक! वेशभूषा! डी जे! लेझिम पथक!खालू बाजा पथक, आदिवासी, बंजारा, नृत्य,तसेंच महिला पुरुष, युवा युवती, जेष्ठ नागरिक,पारंपरिक वेष परिधान करून हातात भगवा ध्वज घेऊन बाईक रैली काढण्यात आली. समितीचे सदस्य सुनिल थळे, सीताराम मेस्त्री, नरेंद्र दळवी, नागेश मोरे,प्रकाश परब,यांनी ही माहिती दिली.
दिंडोशी गुढी पाडवा शोभा यात्रा समिती(नियोजित) ह्या नावाखाली इतर उपक्रम राबविले जातात! समिती तर्फे मोफत शव वाहिनी, दुर्घटना ग्रस्तांना मदतअशी समाजपयोगी उपक्रम ह्या समिती कडून केली जातात अशी माहिती सुनिल थळे यांनी दिली.
ठाकूर संकुलामध्ये नववर्षाचे स्वागत
सालाबादप्रमाणे या वर्षीही कांदिवली पूर्व येथील ठाकूर संकुलमध्ये "नववर्ष स्वागत समिती" तर्फे नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत जवळपास 300-350 रहिवाशांनी पारंपारिक वेशभूषेत उस्फुर्त सहभाग दर्शविला. लहान मुले-मुली लेझीम पथक, महिला लेझीम पथक, दुचाकी पथक, कोळी महिला पथक, बँड पथक अशा वेगवेगळ्या पथकांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरणाने अतिशय आनंदाने आणि उत्साहाने शोभयात्रेची शोभा वाढवली.