आज रंगणार ‘लोकमत’चा ‘पॉलिटिकल आयकॉन’ सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 01:45 AM2019-09-09T01:45:18+5:302019-09-09T01:45:42+5:30

राज्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात सायंकाळी चार वाजता या पुरस्कार सोहळ्याला सुरुवात होणार आहे

The 'Political Icon' of Lokmat will be held today | आज रंगणार ‘लोकमत’चा ‘पॉलिटिकल आयकॉन’ सोहळा

आज रंगणार ‘लोकमत’चा ‘पॉलिटिकल आयकॉन’ सोहळा

Next

मुंबई : राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीने स्वत:चे विशेष स्थान निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान नेतेमंडळींचा सन्मान सोहळा आज (सोमवारी) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात रंगणार आहे. ‘लोकमत पॉलिटिकल आयकॉन्स आॅफ मुंबई’ या कार्यक्रमात मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि नवी मुंबई परिसरातील राजकीय नेतृत्वाचा सन्मान करण्यात येणार आहे, शिवाय मुंबई महानगरातील राजकीय व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणाºया कॉफी टेबल बुकचेही प्रकाशन यावेळी करण्यात येणार आहे.

राज्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात सायंकाळी चार वाजता या पुरस्कार सोहळ्याला सुरुवात होणार आहे. सामाजिक जीवनात संघर्ष आणि लोकोपयोगी कामांच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण करणाºया नेत्यांची मांदियाळीच मुंबई महानगर परिसरात आहे. ‘लोकमत पॉलिटिकल आयकॉन्स आॅफ मुंबई’ या पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून अशा नेतृत्वाचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. आकर्षक सन्मानचिन्ह आणि कॉफी टेबल बुक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘पॉलिटिकल आयकॉन्स आॅफ मुंबई’, या विशेष कॉफी टेबल बुकमध्ये राजकारणात उत्कृष्ट कामगिरी करत स्वत:चे स्थान निर्माण केलेल्या, आपल्या कार्यातून मुंबईच्या अभिमानात भर घालणाºया मुंबईतील नेत्यांच्या व्यक्तिरेखांचे संकलन करण्यात आले आहे. मुंबई प्रदेशातील आघाडीच्या राजकारण्यांच्या यशोगाथेचे वर्णन यात असणार आहे.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण व क्रीडामंत्री आशिष शेलार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत राजकीय क्षेत्रातील नामवंतांचा सन्मान होणार आहे.

याशिवाय वनाधिपती, माजी आमदार विनायकदादा पाटील आणि आदर्श ग्राम समितीचे कार्यकारी संचालक पोपटराव पवार या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. राजकारण, समाजकारणासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, राज्यशास्त्र आणि माध्यमांचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठी आहे.

Web Title: The 'Political Icon' of Lokmat will be held today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Lokmatलोकमत