मुंबई :
मुंबई महानगर म्हणजे ‘एमएमआर’ क्षेत्रात गेल्या २५ वर्षांत कोणकोणते बदल झाले? कोणते विभाग कसे बदलले? राजकारण ते गुन्हेगारीकरण, चाळ संस्कृती ते हाय राईज इमारती, नाटक ते सिरीयल व्हाया सिनेमा, विजेचे जग ते नाइटलाइफ आणि अगदी डबेवाला ते इराणी हॉटेल, मुंबईतले किल्ले, सांंस्कृतिक जग अशा विविध विषयांमध्ये झालेले बदल त्या-त्या क्षेत्रातल्या मान्यवरांनी ‘पंचवीस वर्षांची मुंबई’ या विशेष अंकात शब्दबद्ध केले आहेत.मुंबई लोकमतने २५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. हे संपूर्ण वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज, बुधवार, १५ जून रोजी विधान भवनाच्या संयुक्त सभागृहात यानिमित्ताने विविध पक्षांचे राजकीय धुरीण एका व्यासपीठावर येत असल्यामुळे राजकीय जुगलबंदी जोरदार रंगेल.
हा कार्यक्रम लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली आणि लोकमत समूहाचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होईल. हा कार्यक्रम दुपारी ३.३० वाजता हाेणार असून, तो केवळ निमंत्रितांसाठी आहे.