काय सांगता? दोन म्हशींना शोधण्यासाठी राजकीय दबाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 02:11 AM2020-12-16T02:11:05+5:302020-12-16T02:11:16+5:30

आरेच्या युनिट क्रमांक २५ मधील एका तबेल्यातून दोन म्हशी १ डिसेंबर, २०२०च्या रोजी चोरीला गेल्याची तक्रार आरे पोलिसांना मिळाली आहे. त्यांची एकूण किंमत ३ लाखांच्या आसपास आहे.

Political pressure to find two buffaloes! | काय सांगता? दोन म्हशींना शोधण्यासाठी राजकीय दबाव!

काय सांगता? दोन म्हशींना शोधण्यासाठी राजकीय दबाव!

googlenewsNext

मुंबई : गोरेगावमधील आरेच्या तबेल्यातून दोन म्हशींची चोरी करण्यात आली आहे. त्या शोधण्यासाठी पोलिसांवर राजकीय दबाव असल्याची माहिती आहे.

आरेच्या युनिट क्रमांक २५ मधील एका तबेल्यातून दोन म्हशी १ डिसेंबर, २०२०च्या रोजी चोरीला गेल्याची तक्रार आरे पोलिसांना मिळाली आहे. त्यांची एकूण किंमत ३ लाखांच्या आसपास आहे. रात्री १२ ते ३च्या दरम्यान या म्हशी पळविण्यात आल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांनी याप्रकरणी आरे परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे खंगाळले असून  दोन म्हशींबाबत कोणतीही ठोस माहिती हाती लागलेली नाही. दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या म्हशींना शोधण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयातून पोलिसांवर दबाव आणला जात आहे. मात्र हा मंत्री कोण आहे याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे कोरोना काळात नववर्षाच्या आगमनाच्या कार्याला गालबोट लागू नये यासाठी प्रयत्नशील असलेल्या पोलिसांच्या डोक्याला हा नस्ता ताप होऊन बसला आहे.

Web Title: Political pressure to find two buffaloes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.