वांद्रे भाभा रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे उदघाटन करण्यासाठी राजकीय दबाव ?

By जयंत होवाळ | Published: July 5, 2024 07:15 PM2024-07-05T19:15:02+5:302024-07-05T19:15:21+5:30

Mumbai News: वांद्रे भाभा रुग्नालयात कामगार, तंत्रद्न्य व इतर संवर्गातील अनेक पदे रिक्त असून ही पदे भरल्याशिवाय रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे उदघाटन करू नये अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने पालिकेच्या प्रमुख वैद्यकीय अधिक्षक व खातेप्रमुखांकडे केली आहे.

Political pressure to inaugurate the new building of Bandra Bhabha Hospital? | वांद्रे भाभा रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे उदघाटन करण्यासाठी राजकीय दबाव ?

वांद्रे भाभा रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे उदघाटन करण्यासाठी राजकीय दबाव ?

- जयंत होवाळ 
मुंबई - वांद्रे भाभा रुग्नालयात कामगार, तंत्रद्न्य व इतर संवर्गातील अनेक पदे रिक्त असून ही पदे भरल्याशिवाय रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे उदघाटन करू नये अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने पालिकेच्या प्रमुख वैद्यकीय अधिक्षक व खातेप्रमुखांकडे केली आहे. दरम्यान या रुग्णालयाचे उदघाटन लवकर करावे यासाठी पालिका प्रशासनावर राजकीय दबाव असल्याचे कळते.

या रुग्णालयात केवळ कामगारांची १३५ पदे रिक्त आहेत. त्याशिवाय इतर विभागातील कर्मचारी, तंत्रद्न्य व इतर संवर्गातील अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक भार पडत आहे, याकडे सेनेने लक्ष वेधले आहे.

रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे १५ जुलै रोजी उद्गाटन होणार आहे. या इमारतीत बाह्यरुग्ण विभाग (ओ .पी.डी . ) पहिल्या मजल्यावर असणार आहे.मात्र पहिल्या मजल्याकरिता लिफ्टची व्यवस्था नाही. तसेच शौचालय , वॉश बेसिन आदी सुविधाही नाही. त्यामुळे अपूर्ण कामे पूर्ण करावीत , त्यानंतर रुग्णालयाच्या नव्या इमातीचे उदघाटन करावे अशी सेनेची मागणी आहे.

दरम्यान, या रुग्णालयाचे उदघाटन लवकर करावे यासाठी पालिका प्रशासनावर राजकीय दबाव असल्याचे कळते. त्यामुळे प्रमुख वैद्यकीय अधीक्षकांच्या अखत्यारीत ही बाब येत नाही, किंबहुना त्यांना या प्रकरणात काहीही हस्तक्षेप करता येत नाही, असे कळते. त्यामुळे कामगार सेना आता पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांची भेट घेणार आहेत.

रुग्णालयाची नवीन इमारत असल्याने साहजिकच या इमारतीत आणखी नवे विभाग सुरु होणार आहेत. त्या विभागांसाठी अतिरिक्त कर्मचारी आवश्यक आहेत. आधीच कर्मचाऱ्यांची वानवा असताना , नवे रुग्णालय सुरु करून काय साधणार , कर्मचाऱ्यांअभावी रुग्णालय कसे चालवणार असा युनियनचा सवाल आहे.

Web Title: Political pressure to inaugurate the new building of Bandra Bhabha Hospital?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.