राजकारण रस्ता रुंदीकरणाचे

By admin | Published: December 13, 2014 01:17 AM2014-12-13T01:17:19+5:302014-12-13T01:17:19+5:30

गेल्या अनेक वर्षापासून मुंबईतील रखडलेला प्रकल्प म्हणजे कुर्ला-अंधेरी मार्गाचे रुंदीकरण. अत्यंत रहदारीच्या या मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव अनेक वर्षे भिजत पडून आहे.

Political road widening | राजकारण रस्ता रुंदीकरणाचे

राजकारण रस्ता रुंदीकरणाचे

Next
मुंबई : गेल्या अनेक वर्षापासून मुंबईतील रखडलेला प्रकल्प म्हणजे कुर्ला-अंधेरी मार्गाचे रुंदीकरण. अत्यंत रहदारीच्या या मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव अनेक वर्षे भिजत पडून आहे. पण आता कुर्ला-अंधेरी मार्गाच्या रुंदीकरणासाठी महापालिकेच्या ‘एल’ विभागाने पावले उचलली आहेत. असे असतानाच या कामाच्या रुंदीकरणासह त्याचे श्रेय लाटण्यासाठी येथील राजकीय पक्षांमध्येही कमालीची चढाओढ निर्माण झाली आहे. मोर्चे आणि आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय पक्ष ताकद पणाला लावत असून, या मार्गाच्या रुंदीकरणाच्या श्रेयासाठी आतापासूनच सगळ्या राजकीय नेत्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे चित्र दिसून येत आहे. 
कुर्ला पश्चिमेकडून अंधेरी पूर्वेकडे प्रवास करताना कमानी जंक्शनपासून साकीनाका जंक्शनर्पयतच्या पट्टय़ात वाहनचालकांना मोठय़ा प्रमाणावर वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. महत्त्वाचे म्हणजे या मार्गावरील कमानीपासून साकीनाक्यार्पयतचा रस्ता हा अरुंद असल्याने ऐन सकाळी आणि सायंकाळी तसेच शाळा सुटण्याच्या वेळांमध्येही या मार्गावर वाहतूककोंडी नेहमीचीच झालेली आहे. वाहनचालकांसह बहुतांश पादचारी वर्गाचा वेळ प्रवासातच वाया जातो.
या रस्त्यालगत अनधिकृतरीत्या उभ्या करण्यात आलेल्या वाहनांमुळे वाहतूककोंडीत अधिकच भर पडते. विशेष म्हणजे कुर्ला-अंधेरी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे आणि येथील वाहतुकीची कोंडी सुटावी म्हणून सर्वप्रथम ‘लोकमत’ने हा विषय उचलून धरला आहे. शिवाय रस्त्याचे रुंदीकरण होताना कोणीही बेघर होऊ नये, म्हणूनही कुर्ला पश्चिमेकडील सामाजिक कार्यकर्ते राकेश पाटील यांनीही साद घातली होती. 
या रस्त्यावरील अनधिकृत पार्किगबाबत आवाज उठविण्यात आल्यानंतर येथील अनधिकृत पार्किगला ब:याच प्रमाणात आळाही बसला. परंतु मुळातच हा परिसर उद्योगधंद्यांचा असल्याने येथील ही समस्या अद्याप जैसे थेच आहे. (प्रतिनिधी)
 
च्महापालिकेच्या ‘एल’ विभागाने 8 डिसेंबर रोजी कुर्ला-अंधेरी मार्ग रुंदीकरणात बाधित बांधकामांची पात्रता/अपात्रता यादी प्रसिद्ध केली आहे. रुंदीकरणाच्या कामात अडसर ठरणा:या बांधकामांना या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. बाधितांनी कागदपत्रे सादर केल्यानंतर आता पात्र-अपात्रंची यादी एल वॉर्डने प्रसिद्ध केली आहे. यादीबाबत आक्षेप असल्यास ‘एल’ विभागाच्या कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.
 
राजकीय चढाओढ
काँग्रेसचे स्थानिक आमदार नसीम खान यांचा या परिसरात चांगलाच दबदबा आहे. गेल्या अनेक वर्षापासून कुर्ला-अंधेरी रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान कोणत्याही राजकीय पक्षाने हा मुद्दा उचलून धरला नाही. मात्र आता याच आठवडय़ात भारतीय जनता पार्टीचे सीताराम तिवारी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिलीप लांडे यांनी एका दिवसाआड ‘एल’ विभागावर मोर्चे काढल्याने या प्रश्नाला राजकीय कलाटणी मिळाली आहे.
 
मतांचे राजकारण
कमानी ते साकीनाका रस्ता रुंदीकरणामागे मोठय़ा प्रमाणात मतांचे राजकारण गुंतलेले आहे. गेली तीन टर्म चांदिवली विधानसभा मतदारसंघात नसीम खान आमदार आहेत. या रस्त्यावरील बहुतेक छोटे-मोठे उद्योजक नसीम खान यांचे मतदार आहेत. त्यामुळे या रुंदीकरणाला खान अटकाव करतात, असा आरोप विरोधक आता करत आहेत. त्यामुळे आता नव्याने स्थापन झालेले सरकार या रस्ता रुंदीकरणाबाबत काय भूमिका घेते हे पाहणो महत्त्वाचे आहे. 
 

 

Web Title: Political road widening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.