मुस्लीम प्रश्नांचे राजकीयकरण- सलमान खुर्शीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 05:22 AM2018-06-19T05:22:07+5:302018-06-19T05:22:07+5:30

सध्याच्या काळात मुस्लीम प्रश्नांचे जाणीवपूर्वक राजकीयकरण केले जात आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीत पुढील निवडणुकीत मुस्लीम समाजावर मोठी जबाबदारी आहे.

Politicalization of Muslim questions- Salman Khurshid | मुस्लीम प्रश्नांचे राजकीयकरण- सलमान खुर्शीद

मुस्लीम प्रश्नांचे राजकीयकरण- सलमान खुर्शीद

Next

मुंबई : सध्याच्या काळात मुस्लीम प्रश्नांचे जाणीवपूर्वक राजकीयकरण केले जात आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीत पुढील निवडणुकीत मुस्लीम समाजावर मोठी जबाबदारी आहे. या जबाबदारीचे भान ठेवून मुस्लीम समाजाने निर्णय घ्यावा, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी केले आहे.
आॅल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसतर्फे ‘भारत - भूतकाळ, वर्तमान व भविष्य’ या विषयावर सोमवारी वांद्रे पश्चिम येथील फादर अ‍ॅग्नल सभागृहात परिसंवाद आयोजित करण्यात आला होता, त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत सुधींद्र कुलकर्णी हेदेखील याप्रसंगी उपस्थित होते. या वेळी खुर्शीद म्हणाले की, दहशतवादाचा कोणताही धर्म नसतो. दहशतवाद्यांमध्ये हिंदू व मुस्लीम असा फरक करता येत नाही. कोणत्याही धर्माकडून दहशतवादी बनण्यास सांगितले जात नाही. राजकारणात जनमताला आपल्याकडे फिरवण्यास मतदारांना आकर्षित करण्यासाठी व विविध बाबी योग्य प्रकारे सांगणे आवश्यक असते. आम्हालाही यापुढे याबाबत विचार करावा लागेल. आम्हाला निश्चितच अधिक परिश्रम करावे लागतील. देशातील मुख्य माध्यमांंमध्ये राजकीय परिस्थितीचे प्रतिबिंब पडते. त्यामुळे मार्केट बदलले की माध्यमेदेखील बदलतील, असे मतही त्यांनी मांडले.
२ जी घोटाळ्यावर भाष्य करताना खुर्शीद म्हणाले की, राजकीय हेतूने खोटे आरोप करण्यात आले. न्यायालयाने पुरेसे पुरावे नसल्याने आरोपींना दोषी ठरवता येत नसल्याचे १६०० पानी निकालपत्रात स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतरही आरोप करणाऱ्यांचा आवाज काही बंद झाला नव्हता, असे मतही त्यांनी व्यक्त केले. या प्रकरणात आम्ही प्रभावीपणे बचाव करण्यात कमी पडलो. ती आमची चूक होती, त्यातून आम्ही नक्कीच शिकलो आहोत. देशाच्या सध्याच्या परराष्ट्र धोरणात वर्षानुवर्षे काम करणाºया मुत्सद्दींना बाजूला करण्यात आल्याची भावना या समूहामध्ये बळावल्याचेही ते म्हणाले.
या वेळी सुुधींद्र कुलकर्णी म्हणाले, आपली संस्कृती एकमेकांना जोडणारी आहे, काँग्रेसने बदलण्याची गरज आहे. काँग्रेस नेत्यांमध्ये, धोरणांत नवीन विचारधारा येणे गरजेचे आहे. चांगल्या बाबींना पुढे आणण्याची व त्यांना महत्त्व देण्याची गरज आहे.

Web Title: Politicalization of Muslim questions- Salman Khurshid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.