Raj Kundra Arrest: 'राजकारणी पोर्न पाहतात', राज कुंद्रांचं 'ते' ट्विट होतंय व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 01:33 PM2021-07-20T13:33:40+5:302021-07-20T13:34:23+5:30
Raj Kundra Arrest: "भारतात अभिनेते क्रिकेट खेळत आहेत, क्रिकेटपटू राजकारणात येत आहेत, राजकारणी पोर्न पाहत आहेत आणि पोर्न स्टार्स अभिनयाच्या क्षेत्रात येत आहेत"
पोर्नोग्राफी कंटेंट प्रकरणात दोषी आढळल्याने मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा (Raj kundra arrest) यांना सोमवारी रात्री अटक केली. या अटकेनंतर राज कुंद्रा यांचं एक जुनं ट्विट सोशल मीडियात व्हायरल झालं आहे. यात राज कुंद्रा ट्विटरकरांसोबत वेश्याव्यवसाय आणि अश्लीलता यातील फरकावरुन चर्चा केली होती. ('Politicians watching porn': Raj Kundra's old tweets go viral after his arrest)
"अश्लिलता (पोर्न) विरुद्ध वेश्याव्यवसाय यातील फरक लक्षात घेऊ. कॅमेरासमोर सेक्स करण्यासाठी एखाद्याला पैसे देणे कायदेशीर आहे का? एकाला एक आणि दुसऱ्याला वेगळा नियम असं का?", असं ट्विट राज कुंद्रा यांनी २९ मार्च २०१२ साली केलं होतं.
So #RajKundra will debate this with @MumbaiPolice now ... 😬 pic.twitter.com/4YhupmokaK
— The DeshBhakt (@TheDeshBhakt) July 19, 2021
राज कुंद्रा यांचं याच संदर्भातील आणखी एक ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे. ३ मे २०१२ रोजी राज यांनी केलेल्या ट्विटनं सोशल मीडियात जोरदार चर्चा झाली होती. "भारतात अभिनेते क्रिकेट खेळत आहेत, क्रिकेटपटू राजकारणात येत आहेत, राजकारणी पोर्न पाहत आहेत आणि पोर्न स्टार्स अभिनयाच्या क्षेत्रात येत आहेत", असं ट्विट राज कुंद्रा यांनी केलं होतं.
राज कुंद्रांच्या या जुन्या ट्विट्सचे स्क्रीनशॉट शेअर करुन ट्विटरकर आता त्यांना ट्रोल करू लागले आहेत. मुंबई येथे फेब्रुवारी 2021 मध्ये अश्लील चित्रपट बनवून काही अॅप्स आणि ओटीटी फ्लॅटफॉर्मवर दाखविल्याबद्दल गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात राज कुंद्रा हे मुख्य सूत्रधार असल्याचे पुरावे मिळाल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. आमच्याकडे यासंदर्भात पुरेसे पुरावे आहेत, असेही गुन्हे शाखेनं सांगितलं आहे.