राजकारण तापलं! सुशांत सिंग प्रकरणी फडणवीसांचा फोटो ट्विट करत काँग्रेसने केली चौकशी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 10:27 PM2020-08-28T22:27:10+5:302020-08-28T22:27:27+5:30
Sushant Singh Rajput Case : याच फोटोवर रिप्लाय करताना काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा संदीप सिंहबरोबरचा फोटो पोस्ट करत या प्रकरणामध्ये राज्य सरकारने भाजपा अँगलनेही तपास करावा अशी मागणी केली आहे.
सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणामध्ये रोज नवे वळण येत असतानाच या प्रकरणावरुन राजकारणही तापले आहे. अशातच आता या प्रकरणामध्ये ड्रग्जबाबतीत माहितीनंतर एनसीबीने रियासह अन्य लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्ती, मित्र संदीप सिंह यांनी सुशांतला ड्रग्ज दिल्याचा आरोप काही whats app वरील चॅटवरून समोर आले आहे.
ड्रग्जच्या विषयावरुन आता भाजपाचे आमदार राम कदम यांनी बॉलिवूडमधील ड्रग्जच्या नेक्ससची चौकशी करावी अशी मागणी केली होती. कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात पत्र पाठलं आहे. त्याचा फोटो त्यांनी ट्विट केला आहे. याच फोटोवर रिप्लाय करताना काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा संदीप सिंहबरोबरचा फोटो पोस्ट करत या प्रकरणामध्ये राज्य सरकारने भाजपा अँगलनेही तपास करावा अशी मागणी केली आहे.
राम कदम यांचं ट्विट रिट्विट करत सचिन सावंत यांनी थेट भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांना मी विनंती करतो की भाजपा अँगलकडेही लक्ष द्यावे. सीबीआयकडून संदीप सिंहची सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात ड्रग्जप्रकरणी चौकशी केली जाणार आहे. संदीप हा बायोपीक ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचा निर्माता होता. ज्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण फडणवीस यांच्या हस्ते झाले,” असं ट्विट सावंत यांनी केलं आहे. या ट्विटबरोबर त्यांनी या चित्रपटाच्या पोस्टर लॉन्च सोहळ्याचे फोटोही पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये संदीप सिंह, फडणवीस, चित्रपटात मोदींची भूमिका साकारणारा अभिनेता विवेक ओबेरॉय एकाच स्टेजवर उभे असल्याचे दिसत आहे.
.@OfficeofUT , @AnilDeshmukhNCP request you to see @BJP4India angle in following request. CBI to qn Mr. Sandeep Singh in drug nexus in #SushantSinghRajputDeathCase . He is a producer of a biopic 'PM Narendra Modi' whose poster was launched by Fadnavis ji.https://t.co/ZmqaXwWCGPhttps://t.co/Ne1lFxZKEupic.twitter.com/7TyO3u2Trn
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 28, 2020
#SushantSinghRajputCase#SushantSingRajputDeathCase@OfficeofUT@CMOMaharashtra@AnilDeshmukhNCPpic.twitter.com/c6R3nVc5aQ
— Ram Kadam (@ramkadam) August 26, 2020
अन्य महत्वाच्या बातम्या...
मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती
पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल
चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?