वक्तृत्व स्पर्धेतही राजकारण’
By admin | Published: September 14, 2014 12:34 AM2014-09-14T00:34:43+5:302014-09-14T00:34:43+5:30
आजच्या तरुणाईला राजकारणात फारसा रस नाही, असा सर्वसाधारण समज बदलायची वेळ आता आली आहे.
Next
मुंबई : आजच्या तरुणाईला राजकारणात फारसा रस नाही, असा सर्वसाधारण समज बदलायची वेळ आता आली आहे. महाराष्ट्रातील तरुणांना राजकारणात होत असलेला बदल व सत्तापालटात अधिक आवड असल्याचे दिसून येत आहे. माटुंगा येथील रामनारायण रुईया महाविद्यालयात सुरू झालेल्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत याचीच झलक दिसून आली.
महाराष्ट्रातील तरुण वैचारिक विचारवंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी रुईया मराठी वादसभा विभागातर्फे ‘प्रा. गोवर्धन पारीख राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या वक्तृत्व स्पर्धेचे यंदाचे 36 वे वर्ष आहे. स्पर्धकांना ‘भारतीय राजकारण नव्या वळणावर’, ‘नैसर्गिक आपत्तीचा धडा’, ‘मराठी सिनेमांचे वास्तव’, ‘झटपट श्रीमंतीचा भुलभुलय्या’, ‘सोशल नेटवर्किग साइट्स: संवादाची गरज’ असे पाच विषय देण्यात आले. यात सर्वाधिक स्पर्धकांनी भारतीय राजकारण विषयाला पसंती दर्शवली.
‘राजकारण हा माझा आवडता विषय आहे. या विषयाचे माङो वाचन अधिक आहे. मात्र इतर वेळी मित्रंबरोबर राजकारणावर बोलायला लागल्यावर त्यांना त्यात अजिबात रस नसतो. त्यामुळे यासारख्या वक्तृत्व स्पर्धेत समविचारी व्यक्ती भेटतात. शिवाय असा वैचारिक विषय मांडण्यासाठी व्यासपीठ मिळाल्यामुळे अधिक आनंद होतो. मी मागच्या वर्षी तिसरा क्रमांक पटकावला होता. यंदा प्रथम येण्यासाठी जय्यत तयारी केली आहे,’ असे साठय़े महाविद्यालयाचा मयूर येवले याने सांगितले.
या स्पर्धेत सहभागी झालेला रूपारेल कॉलेजचा श्रेयस मेहेंदळे म्हणाला की, ‘मी या स्पर्धेत भाग घेण्याचे माङो दुसरे वर्ष आहे. या महाराष्ट्रातील मानांकित स्पर्धेचे महत्त्व माहीत आहे, म्हणूनच अधिक जोमाने तयारी करून पुन्हा स्पर्धेत उतरलो आहे. मी यंदा ललित विषय निवडला आहे. त्यामुळे अधिकाधिक प्रेक्षकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. माङया कॉलेजच्या मराठी वा्मय मंडळाच्या अनघा मांडवकर यांनी माझी या वक्तृत्व स्पर्धेसाठी फार तयारी करून घेतली आहे.’
प्रथमच या स्पर्धेत सहभागी होणारी रसायनी येथील पिल्लेस अभियांत्रिकी महाविद्यालयाची मोहिनी देसाई आपला अनुभव सांगताना म्हणते की, ‘दहावीनंतर मराठी विषयाशी संबंधच तुटला. त्यानंतर विज्ञान शाखा आणि अभियांत्रिकीच्या अभ्यासामुळे मराठी भाषा केवळ घरात बोलण्यापुरती मर्यादित राहिली. मात्र, मातृभाषेची ओढ लहानपणापासूनच होती. आमच्या भागात मराठीसाठी अशा स्पर्धा घेतल्या जात नाहीत. त्यामुळे मला प्रा. गोवर्धन पारीख या मानांकित स्पर्धेबद्दल समजल्यावर मी लगेच सहभागी व्हायचे ठरवले. माङया मोठय़ा भावाने रोहन देसाईने माङया विषयाची तयारी करून घेतल्यामुळे फार मदत झाली.’
विद्याथ्र्यानी मांडलेले विषयाचे महत्त्व आम्ही तपासून पाहत आहोत. मात्र, अनेकदा दुसरी बाजू समोर येताना दिसत नाही. स्पर्धकांमध्ये माध्यमांमुळे भारावलेपण आल्याचे स्पर्धेच्या परीक्षक कुसुम बाळसराफ आणि अजरुन जगधने यांनी सांगितले. ही स्पर्धा विद्याथ्र्याना त्यांच्या भावी आयुष्यातही उपयोगी पडेल. व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच समकालीन विचार मांडण्याची संधी त्यांना मिळत असल्याचे मराठी वादसभा विभागाच्या प्रमुख लीना केदारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)