मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 10 पेक्षा जास्त खासदार निवडून आल्यास शरद पवार हेच पंतप्रधान होतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजीद मेमन यांनी व्यक्त केला आहे. सध्या आमच्या पक्षाकडे जास्त खासदार नाहीत. दुर्दैवाने आमचा पक्षही तेवढा मोठा नाही. पण, 2-3 खासदार असलेल्या पक्षाचे नेते एच. डी. देवेगौडा या देशाचे पंतप्रधान बनले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 पेक्षा जास्त खासदार निवडून आल्यास आणि आघाडीचं सरकार स्थापन करण्याची वेळ आल्यास, शरद पवार यांचेच नाव आघाडीवर असेल, असेही मेमन यांनी म्हटले. माजीद मेमन यांचे हे मत तुम्हाला कितपत पटते. राष्ट्रवादी नेत्याच्या या विधानाशी आपण सहमत आहात का? मेमन यांच्या या विधानाबद्दल तुम्हाल काय वाटतं ? हे तुम्ही आम्हाला मतदान करून कळवा.