मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेच्या (सिनेट) १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांसाठी रविवारी, २५ मार्च रोजी मतदान होणार आहे. विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालयांतील एकूण ५३ मतदान केंद्रांवर सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान मतदान पार पडेल. अधिसभेच्या केवळ १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता एकूण ६८ उमेदवार रिंगणात आहेत.उमेदवारांमध्ये खुल्या प्रवर्गातून ३६, अनुसूचित जाती प्रवर्गातून ११, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून ७, महिला प्रवर्गातून ६, अनुसूचित जमाती आणि भटक्या जमाती प्रवर्गांतून प्रत्येकी ४ असे एकूण ६८ उमेदवार या निवडणुकीसाठी उभे आहेत. २५ मार्च रोजी आयोजित केलेल्या या मतदान प्रक्रियेत नोंदणीकृत पदवीधरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन कुलसचिव (प्र.) तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिनेश कांबळे यांनी केले आहे. मतमोजणी २७ मार्च रोजी केली जाणार आहे.
पदवीधर मतदारसंघाचे १० जागांसाठी उद्या मतदान; ६८ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 2:38 AM