मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधात महाआघाडी उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असले, तरी वेळप्रसंगी स्वबळाचीही तयारी ठेवण्याचा सावध पवित्रा काँग्रेसने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांची चाचपणी करणार आहे. १५ ते १७ नोव्हेंबरदरम्यान सर्व मतदारसंघातील स्थितीचा आढावा घेतानाच, संभाव्य उमेदवारांशी चर्चेचाही कार्यक्रम प्रदेश काँग्रेसने जाहीर केला आहे.काँग्रेसचे प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत दादर येथील टिळक भवन कार्यालयात या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी विभागनिहाय सर्व मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. या बैठकीसाठी संबंधित मतदारसंघ आणि जिल्ह्यातील प्रमुख नेते, संभाव्य उमेदवार उपस्थित असतील.गुरुवारी बैठकगुरुवारी १५ तारखेला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राची बैठक आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवारी १६ तारखेला विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि शनिवारी कोकण विभागाची बैठक असेल, अशी माहिती प्रदेश काँग्रेसच्या प्रसिद्धी विभागाने दिली आहे.
काँग्रेसची सर्व लोकसभा मतदारसंघांत चाचपणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 5:15 AM