दोडामार्ग, वैभववाडीत शांततेत मतदान

By Admin | Published: November 1, 2015 10:41 PM2015-11-01T22:41:08+5:302015-11-02T00:29:30+5:30

नगरपंचायत निवडणूक : वैभववाडीत विक्रमी

Polling in Doda Marg, Vaibhavavadi peaceful | दोडामार्ग, वैभववाडीत शांततेत मतदान

दोडामार्ग, वैभववाडीत शांततेत मतदान

googlenewsNext

वैभववाडी/दोडामार्ग : वाभवे-वैभववाडी व कसई दोडामार्ग नगरपंचायतींसाठी रविवारी विक्रमी मतदान झाले. वाभवे-वैभववाडीत ८९.५२, तर कसई दोडामार्गसाठी ८३ टक्के मतदान झाले. पोलीस प्रशासनाने ठेवलेल्या चोख बंदोबस्तामुळे मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
नव्याने झालेल्या वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी चुरशीने शांततेत ८९.५२ टक्के असे विक्रमी मतदान झाले. प्रभाग पाचमध्ये सर्वाधिक ९६.९७, तर १३ मध्ये सर्वांत कमी ८३.८७ टक्के मतदान झाले. पोलीस प्रशासनाने ठेवलेल्या चोख बंदोबस्तामुळे मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही गैरप्रकार घडू शकला नाही.
दरम्यान, मतदान केंद्राच्या परिसरात आणि वैभववाडी शहरात संशयास्पद फिरणाऱ्या सातजणांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले. वैभववाडीत ३४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत ८३ टक्के मतदान झाले. काही ठिकाणी किरकोळ कुरघोडी वगळता सतराही प्रभागात शांततेत मतदान झाले. एकूण २४९५ मतदारांपैकी २०७२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १७ प्रभागांतील ४८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. (वार्ताहर)
आज निकाल
आज, सोमवारी सकाळी १० वाजता दोडामार्ग व वैभववाडी तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. अवघ्या दोन तासात मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने या नगरपंचायतींवर कोणाचा झेंडा फडकेल हे समजणार आहे.

Web Title: Polling in Doda Marg, Vaibhavavadi peaceful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.