Join us

मतांसाठी पाणीपट्टीवाढ युतीने रोखली?

By admin | Published: February 07, 2016 1:28 AM

पाण्याच्या वाढत्या मागणीची तजवीज करण्यासाठी दरवर्षी पाणीपट्टी व मलनिस्सारण करामध्ये करण्यात आलेली वाढ २०१६-२०१७ या आर्थिक वर्षात स्थगित करण्यात आली आहे़ पुढच्या वर्षी

मुंबई : पाण्याच्या वाढत्या मागणीची तजवीज करण्यासाठी दरवर्षी पाणीपट्टी व मलनिस्सारण करामध्ये करण्यात आलेली वाढ २०१६-२०१७ या आर्थिक वर्षात स्थगित करण्यात आली आहे़ पुढच्या वर्षी पालिका निवडणुका असल्याने शिवसेना-भाजपा युतीने जाणीवपूर्वक ही दरवाढ तूर्तास पुढे ढकलली असल्याचे बोलले जात आहे़पाण्याची मागणी आणि पुरवठ्यातील तफावत दूर करण्यासाठी पालिकेने गारगाई, पिंजाळ, दमणगंगा असे जलप्रकल्प हाती घेतले आहेत़ मात्र या प्रकल्पांचा खर्च कोट्यवधींचा आकडा पार करीत असल्याने तत्कालीन आयुक्त सुबोध कुमार यांनी पाणीपट्टीमध्ये दरवर्षी ८ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव २०१२मध्ये मंजूर करून घेतला़ त्यानुसार दरवर्षी पाणीपट्टी आणि मलनिस्सारण करामध्ये वाढ होत आहे़ जूनमध्ये ही दरवाढ दरवर्षी होत आहे़ मात्र यंदा पालिकेच्या तिजोरीत पुरेसे उत्पन्न असल्याचे कारण देत ही दरवाढ न करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे़ आगामी महापालिका निवडणुकांच्या काळात ही दरवाढ शिवसेना-भाजपाला परवडणारी नाही़ म्हणून तूर्तास ही दरवाढ पुढे ढकलण्यात आली आहे़ त्यामुळे या वर्षी नागरिकांना दिलासा मिळणार आहे़ (प्रतिनिधी)या शुल्कांमध्ये वाढगेल्या १६ वर्षांमध्ये विविध परवान्यांचे शुल्क वाढलेले नाही़ त्यामुळे या शुल्कांबरोबरच भूमिगत केबल्ससाठी रस्ते खोदणाऱ्या कंपन्यांकडून वसूल केल्या जाणाऱ्या शुल्कात वाढ केली जाणार आहे़ मात्र मालमत्ता कर, मलनिस्सारण कर, अग्निशमन कर यांत तूर्तास वाढ होणार नाही़ मात्र या करांच्या सेवा शुल्कात वाढ होईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले़