प्रदूषण घोटतेय वसुंधरेचा गळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 03:05 AM2018-04-22T03:05:45+5:302018-04-22T03:05:45+5:30
कारखाने, उद्योग यांच्यामुळे कार्बन डाय आॅक्साइड, कार्बन मोनोक्साइड, नायट्रोजन डायआॅक्साइड, सल्फर डायआॅक्साइड अशाप्रकारे हरितवायू हवेत सोडले जातात. यामुळे तापमानवाढ होत असते.
अक्षय चोरगे/कुलदीप घायवट ।
मुंबई : बकाल शहराच्या दिशेने मुंबईची वाटचाल सुरू आहे. येथील पाण्याचे साठे, जंगले, उद्याने, मोकळ्या जागा मुंबईकर आणि प्रशासनाने नष्ट केल्या आहेत. त्यामुळे मुंबईत वसुंधरा असे म्हणण्यासारखे काहीच उरले नाही, असे पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. बकाल झालेल्या मुंबईची अजून वाईट स्थिती होता कामा नये. यासाठी प्रशासनासह मुंबईकरांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, अये मत तज्ज्ञांनी मांडले. जागतिक वसुंधरा दिनी मुंबईकरांनी येथील पर्यावरण वाचविण्याचा निश्चय करावा, असेही आवाहन पर्यावरणतज्ज्ञ, पर्यावरणवादी आणि शहर नियोजन तज्ज्ञांनी केले आहे.
मुंबईत पूर्वी लोक सहलींसाठी शहरातच काही ठिकाणी फिरायला जात होते. हिरवळ असलेल्या, थंड ठिकाणी जाण्याला लोकांची पसंती होती. अशा खूप जागा मुंबईत होत्या. परंतु आता केवळ बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मलबार हील येथील हँगिंग गार्डन व प्रियदर्शनी पार्क आणि सायन येथील महाराष्ट्र नेचर पार्क शिल्लक आहे. ही ठिकाणे शासनाने संवर्धित ठेवली आहेत. परंतु या भागांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अतिक्रमणे झाली आहेत. ती रोखणे गरजेचे आहे. मुंबईतल्या विहिरी नष्ट झाल्या आहेत, अनेक तलाव नष्ट झाले. मिठी नदीचा ºहास होत आहे. नदीच्या पात्रात अतिक्रमणे झाली आहेत. यापुढे असे होऊ नये, यासाठी उपाययोजना करणे गरजेचे असून, यासंदर्भात गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड अॅण्ड असोसिएटच्या गुड अण्ड ग्रीन हेड डॉ. विकास गोस्वामी यांनी सांगितले की, प्लॅस्टिकमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी कचऱ्याचे विभाजन करणे व त्यावर पुनर्प्रक्रिया करणे, हा प्रभावी उपाय आहे. प्लॅस्टिकमुळे समुद्रातील प्रदूषण वाढत आहे. जमिनीवर प्लॅस्टिक कचºयाचा ढीग तयार झाला आहे. त्यामुळे जगभरात दरवर्षी ३५० दशलक्ष टन प्लॅस्टिक निर्माण होते. वसुंधरा दिनाच्या निमित्ताने प्लॅस्टिक प्रदूषण थांबविण्याची गरज आहे. प्लॅस्टिकची विल्हेवाट लावण्याबद्दल सगळीकडे एकसमान नियम असायला हवेत. प्लॅस्टिकच्या वापरामुळे पशुपक्ष्यांना धोका निर्माण होत आहे. देशातील बहुतेक राज्यांत सरकारने प्लॅस्टिकवर बंदी आणली आहे. ही कौतुकाची बाब आहे. प्लॅस्टिकचे धोके, ग्राहकांचे वागण्यातील बदल, कचºयाचे विभाजन, पुनर्प्रक्रिया, कॉर्पोरेट व अन्य घटकांची भागीदारी याविषयी जागृती करण्याची गरज आहे.
वृक्षतोड केल्यामुळे झाडांची सावली
नष्ट झाली आहे. वातावरणातील गारवा कायम राखण्याचे काम झाडे करत आहेत. परंतु त्यांनादेखील विकासकामांसाठी तोडण्यात येत आहे.
शहरातील तलाव, पाणथळ जमिनीवर भराव टाकून पाण्याची जागा नष्ट केली जात आहे. काचेच्या इमारती वाढल्यामुळे प्रखर सूर्यकिरणे परावर्तित होत आहेत. बदलत्या तापमानाचा परिणाम मानवप्राण्यासह उर्वरित पशुपक्षी, सरपटणाºया प्राण्यांवर होत आहे. विकासात्मक कामे करताना पर्यावरणाचा कोणताही विचार केला जात नाही. त्यामुळे अन्नसाखळी विस्कळीत झालेली असून याचे वाईट परिणाम पृथ्वीवर होणार आहेत.
कारखाने, उद्योग यांच्यामुळे कार्बन डायआॅक्साइड, कार्बन मोनोक्साइड, नायट्रोजन डायआॅक्साइड, सल्फर डायआॅक्साइड अशाप्रकारे हरितवायू हवेत सोडले जातात. त्यामुळे तापमानवाढीला कारण मिळते. च्वाहने, फ्रीज, वातानुकूलित यंत्रे, ऊर्जा प्रकल्प, औष्णिक ऊर्जा प्रकल्प यामुळे तापमान वाढते आहे. वाढते बांधकाम-व्यवस्थापन, ई-वेस्ट व्यवस्थापन नसणे, हरित बांधकाम व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतुकीचा वापर, वैयक्तिक वाहनांचा वापर करण्यापेक्षा सार्वजनिक वाहनांचा वापर जास्त प्रमाणात करावा.
मुंबईमधील माहीम नेचर पार्क, आरे कॉलनी, नॅशनल पार्क यांचे संवर्धन करणे उपयुक्त आहे. सौरऊर्जेचा वापर करणे, पाण्याचा अपव्यय टाळावा. पुनर्वापरावर भर देण गरजेचे आहे. च्सद्य:स्थितीत जे भाग ग्रामीण आहेत ते भाग तसेच राहणे अपेक्षित आहेत. ग्रामीण भागच शाश्वत आहेत.
विकास शब्द बंद करायचा आहे. भौतिक विचार करण्याची पद्धत मानवकेंद्री नसावी. कारण ती चुकीच्या दिशेने जाणारी आहे. विचार करण्याची
पद्धत ही निसर्गकेंद्री असावी. नदी, पर्वत, समुद्र, झाडे या नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये मानव जगत आहे. त्यामुळे या साधनसंपत्तीची जपणूक करणे
गरजेचे आहे. आधुनिक माणूस बनून औद्योगिक विकास करता कामा नये.
मुंबईतील वृक्षतोड थांबवायला हवी. जेथे वृक्षतोड केली जाते त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. अनेक विकासक कांदळवन, नदी, नाले, उद्याने यांवर अतिक्रमण करतात. त्यांना चाप लावणे गरजेचे आहे. मुंबईत एक राष्ट्रीय उद्यान आहे. तेही सर्व बाजूंनी विकासकांनी ओरबाडले आहे. मुंबईतील पर्यावरण वाचवूनच वसुंधरा दिन साजरा करता येईल. विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून द्यायला हवे. वसुंधरा दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना पर्यावरण, बागा, जंगलांची गोडी वाटेल, यासाठी मार्गदर्शन करायला हवे.
- राजकुमार शर्मा, पर्यावरणतज्ज्ञ
मुंंबईकरांनी मुंबईच्या पर्यावरणासाठी लाइफस्टाईल बदलायला हवी. येथील स्वच्छतेकडे लक्ष द्यायला हवे. मुंबईत होणारी अतिक्रमणे रोखायला हवीत. अनेक ठिकाणी कांदळवनांवर अतिक्रमणे झाली आहेत, ती वाचवायला हवीत. मेट्रोसाठी वृक्षतोड केली जात आहे. प्रशासनाने शक्य तेवढे कमी वृक्ष मेट्रोसाठी तोडावे. मेट्रोमुळे भविष्यात मुंबईतील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे मेट्रोसारख्या प्रकल्पांना होणारा विरोध थांबवावा. वसुंधरा दिनानिमित्त लहान मुलांची कार्यशाळा घ्यावी. मुलांना झाडांची, फुला-पानांची, फळांची, औषधी वणस्पतींची माहिती द्यावी. मुलांना एखाद्या वनस्पती उद्यानात फिरायला न्यायला हवे.
- परवीश पांड्या, पर्यावरणतज्ज्ञ
तापमानाने चाळिशीचा आकडा पार केला केला. तरीदेखील काही ठिकाणी वेधशाळा नागरिकांची दिशाभूल करून तापमान कमी दाखवत आहे. डोंगराचे क्षेत्र, तिवरांचे प्रदेश नष्ट केल्यामुळे तापमान वाढले आहे. औद्योगिकीकरण, शहरीकरण वाढत आहे. त्यामुळे तापमान वाढत आहे. वातावरणातील कार्बन डायआॅक्साइड वाढल्यामुळे तापमान वाढले आहे. कार्बन उत्सर्जन करणे शून्य केल्याशिवाय तापमान कमी होणार नाही. नाहीतर पृथ्वीचा विनाश होणे अटळ आहे. विकास करण्याच्या नावाखाली केले जाणारे, चालू असलेले प्रकल्प बंद केले
पाहिजेत. तसेच कोणत्याही प्रकारचे विकासात्मक नवीन प्रकल्प राबविण्यात येता कामा नये.
- गिरीश राऊत, पर्यावरणतज्ज्ञ
मुंबई शहर आपण बकाल केले आहे. वसुंधरेच्या ºहासाला आपणच जबाबदार आहोत. त्यामुळे आजच्या जागतिक वसुंधरा दिनानिमित्त मुंबईकरांनी मुंबईतील नैसर्गिक साधनसंपत्ती वाचविण्याचा निश्चय करायला हवा. ती कशी वाचविता येईल यावर सर्वांनी एकत्र येऊन चर्चा करायला हवी. विद्यार्थ्यांना या चर्चांमध्ये सहभागी करून घ्यायला हवे. मुलांना पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगायला हवे. केवळ दोन वृक्ष लावून वसुंधरा वाचणार नाही, तर येथील विहिरी, तलाव, नदी-नाले, समुद्रकिनारे, कांदळवने, उद्याने, जंगल आणि प्राणी वाचवायला हवेत.
- सुलक्षणा महाजन, शहर नियोजनतज्ज्ञ
आजच्या घडीला सर्वत्र सिमेंटची जंगले उभारली गेली आहेत. कुठेही मोकळी जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे खेळती हवा न मिळाल्यामुळे हवा कोंडली जाते. त्यामुळे एकाच ठिकाणी हवा थांबल्यामुळे गरम हवेचे चटके नागरिकांना बसत आहेत. प्रत्येकाच्या घरात, कार्यालयात एसी, कुलर आल्यामुळे घरातील वातावरण थंड केले जाते. त्यामुळे वातावरणातील वाढत्या तापमानाची झळ जास्त बसत नाही. मात्र बाहेरच्या वातावरणात क्षणभर थांबल्यास उकाड्याला सामोरे जावे लागते.
- डी. स्टॅलिन, प्रकल्प संचालक, वनशक्ती
तापमानवाढ ही एक खूप भयावह समस्या असून, संपूर्ण जगासमोर मोठे संकट आहे. या समस्येवर उपाययोजना केली नाही तर पुढची पिढी जिवंत राहण्यास अपात्र असे स्थान निर्माण होईल. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील तापमान संथगतीने सातत्याने वाढत आहे. हे तापमानवाढीला कारणीभूत आहे. वातावरणातील कार्बन डायआॅक्साइड व इतर हरितवायू वाढल्यामुळे तापमानवाढ होते.
- संजय शिंगे, पर्यावरणवादी