संजय कांबळे ल्ल वरपगाव
पोलिसी पेहराव, मात्र तोंडातून येणारे शब्दांचे खेळ, चेह:यावरील हावभाव अशा विविध नकला करून उपस्थित महिला, पुरुषांसह बालगोपाळांना पोट धरून हसायला लावणारा बहुरूपी काळानुरूप नामशेष होत असून ग्रामीण भागाचा बदललेला चेहरा याला कारणीभूत असल्याचे या बहुरूपींचे म्हणणो आहे.
हौसाबाई, नवसाबाई, गंगूबाई, धोंडूबाई, शिरप्या, धोंडय़ा, पांडय़ा.. तुम्ही लगAाला चला! पोरं बांधा खुंटीला, पाटा-वरवंटा घ्या डोकीला.. पण तुम्ही लगAाला चला!! ढेकणांची उसळ, पिसवांची मिसळ, तू घाल बाई घुसळ आणि पंगतीला बसा, पण तुम्ही लगAाला चला.. अशा शब्दांची फेकाफेकी करून विनोद निर्माण करणारी बहुरूपी जमात दिवाळी संपल्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत गावोगावी फिरून पोट भरते. खाकी शर्ट-पॅण्ट, टोपी, शिटी असा पोलीसी पेहराव पाहून प्रथमदर्शनी लोक घाबरतात. पण, त्यांच्याकडून शब्दांची होणारी फेकाफेकी, अभिनय यामुळे आपसूकच शाब्दिक व वस्तुनिष्ठ विनोदाची निर्मिती होते अन् लोकनांही ती आवडते. त्यांची ‘भटकी समाज बहुरूपी संघ - मुंबई’ नावाची एक संघटना आहे. भटक्या विमुक्तांचे लोकनेते जी.जी. चव्हाण यांनी बहुरूपी लोकांना एक प्रमाणपत्र देऊन बहुरूपी व्यवसाय करण्याची संधी दिली आहे.
या संस्थेचे अध्यक्ष आहेत, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबऴ तिचे प्रमाणपत्र दाखवून आपण बहुरूपी असल्याचे ते लोकांना सांगूनपाच, दहा रुपये, जेवण अथवा जे काही मिळेल, ते स्वीकारून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
सुरुवातीच्या काळात ग्रामीण भागांत बहुरूप्यांना खूप मानपान मिळत होता.
कमाई पण होती. मात्र, आता गावाचा चेहरा बदलला आहे. घराजवळ गेल्यावर लोक दरवाजा बंद करून घेतात, याचे वाईट वाटते, असे बहुरूपी रतननाथ व हरिनाथ यांनी सांगितले.
बहुरूपी म्हणजेच बहुआयामी व्यक्तिमत्त्व असणारा नकलाकार. त्याला माहिती असते की, शेतकरी दिवाळीनंतर पिकांची कापणी करतो. खळ्यांमध्ये धान्याची रास पडलेली असते. बळीराजा आनंदी असतो. याचाच ते फायदा घेतात व हसवून बिदागी मिळवितात.
- संतोष मनेर, अभ्यासक,
बहुरूपींचे जीवन, खोपोली