तलाव ९९ टक्के फूल; पाण्याचे टेन्शन मिटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 01:14 AM2019-09-27T01:14:38+5:302019-09-27T01:14:41+5:30

पुढच्या जुलै महिन्यापर्यंत मुंबईकरांची वणवण टळली

Pond 5 percent flower; Water tension erased | तलाव ९९ टक्के फूल; पाण्याचे टेन्शन मिटले

तलाव ९९ टक्के फूल; पाण्याचे टेन्शन मिटले

Next

मुंबई : सर्व रेकॉर्ड मोडीत मुसळधार बरसणाऱ्या पावसाने पाण्याचे टेन्शन मात्र मिटवले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्व तलाव भरून वाहत आहे. तलावांमध्ये एकूण ९८.८२ टक्के जलसाठा जमा असल्याने पुढच्या जुलै महिन्यापर्यंत मुंबईकरांची वणवण टळली आहे.

वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी तलावांमध्ये एकूण १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या वर्षी १ आॅक्टोबर रोजी तलावांमध्ये ९१ टक्के जलसाठा असल्याने मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. ही कपात आठ महिन्यांनंतर रद्द करण्यात आली. मात्र या वर्षी सप्टेंबर महिन्यातही मुसळधार हजेरी लावणाºया पावसामुळे सर्व तलाव भरून वाहत आहेत. पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहणाºया मुंबईला यामुळे दिलासा मिळाला आहे.
सध्या तलावांमध्ये एकूण १४ लाख ४३ हजार दशलक्ष लीटर जलसाठा आहे.

Web Title: Pond 5 percent flower; Water tension erased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.