पुजा भट्ट १८ वर्षानंतर करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
By admin | Published: February 24, 2016 04:44 PM2016-02-24T16:44:45+5:302016-02-24T16:44:45+5:30
भिनेत्री पुजा भट्ट 18 वर्षानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चित्रपटाचे नाव अजून ठरलेलं नाही. तसंच या चित्रपटाचं दिग्दर्शन कोण करणार हेदेखील अजून ठरायचे बाकी आहे
ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. २४ - अभिनेत्री पुजा भट्ट 18 वर्षानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चित्रपटाचे नाव अजून ठरलेलं नाही. तसंच या चित्रपटाचं दिग्दर्शन कोण करणार हेदेखील अजून ठरायचे बाकी आहे. या चित्रपटाची कथा पुजा भट्टचे वडील आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांनी लिहिलेली आहे.
पुजा भट्टने 1989मध्ये 'डॅडी' चित्रपटातून बॉलिवूडमधध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश भट्ट यांनीच केलं होतं. या चित्रपटात पुजा भट्ट एका महत्वाकांक्षी महिलेची व्यक्तिरेखा साकारणार आहे. जी पैसा आणि नाव मिळवण्यासाठी आपल्या मुलीला सोडून जाते. 'डॅडी' चित्रपटात दाखवलेल्या कथेच्या उलट कथा या चित्रपटात दाखवली जाणार असल्याचं पुजा भट्टने पीटीआयशी बोलताना सांगितले.
१९९९मध्ये महेश भट्ट यांनी दिग्दर्शन केलेला 'जख्म' चित्रपटामध्ये अभिनय केल्यानंतर पुजा भट्टने एकही चित्रपट स्विकारला नव्हता. सध्या चांगल्या कथा येत आहेत त्यामुळे मी पुन्हा अभिनय करायच ठरल्याचं पुजा भट्टने सांगितल आहे.