Pooja Chavan Case: तिने २५ लाखांचं कर्ज काढलं, कोरोना आला, अन्...; पूजाच्या वडिलांनी मांडली कैफियत

By महेश गलांडे | Published: February 14, 2021 08:11 PM2021-02-14T20:11:01+5:302021-02-14T20:11:27+5:30

पूजावर 25 ते 30 लाख रुपयांचं लोन होतं, वडिलाचं चांगलं व्हावं, यासाठी तिने बँकेतून कर्ज घेतलं होतं. या कर्जातून बांधकामही काढलं, पण कोरोना आला अन् होत्याचं नव्हत झालं. या काळात गेल्यावर्षी आम्ही कोंबड्या फुकट वाटल्या

Pooja Chavan Case: She took out a loan of Rs 25 lakh, Corona came, etc. Pooja's father made an argument | Pooja Chavan Case: तिने २५ लाखांचं कर्ज काढलं, कोरोना आला, अन्...; पूजाच्या वडिलांनी मांडली कैफियत

Pooja Chavan Case: तिने २५ लाखांचं कर्ज काढलं, कोरोना आला, अन्...; पूजाच्या वडिलांनी मांडली कैफियत

Next
ठळक मुद्देपूजावर 25 ते 30 लाख रुपयांचं लोन होतं, वडिलाचं चांगलं व्हावं, यासाठी तिने बँकेतून कर्ज घेतलं होतं. या कर्जातून बांधकामही काढलं, पण कोरोना आला अन् होत्याचं नव्हत झालं. या काळात गेल्यावर्षी आम्ही कोंबड्या फुकट वाटल्या

पुणे - शहरातील हडपसर परिसरात रविवारी (दि. ७) एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली होती. महाराष्ट्रातील एका बड्या मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून या तरुणीने आत्महत्या केल्याची चर्चा समाजमाध्यमांमध्ये सुरू आहे. या संवेदनशील घडनेबाबत पूजाचे वडील यांनी आमची मुलगी असे कृत्य करणार नाही. तिच्यावर पूर्ण विश्वास होता असल्याची सांगून पूजाचे आत्महत्येचे राजकारण थांबवा, असे आवाहन केलंय. त्यासोबतच, पूजावर 25 लाख रुपयांचे कर्ज होते, कोरोनामुळे परिस्थिती बिकट बनली होती, असेही त्यांनी सांगितले.  

पूजावर 25 ते 30 लाख रुपयांचं लोन होतं, वडिलाचं चांगलं व्हावं, यासाठी तिने बँकेतून कर्ज घेतलं होतं. या कर्जातून बांधकामही काढलं, पण कोरोना आला अन् होत्याचं नव्हत झालं. या काळात गेल्यावर्षी आम्ही कोंबड्या फुकट वाटल्या, तब्बल 25 लाख रुपयांचा मला लॉस झाला. यात, आम्हाला कुठूनही मदत मिळाली नाही. कसंबसं, आम्ही त्यातूनही उभारलो. पण, बर्ड फ्लू आला अन् पुन्हा आमचा माल केवळ 30 ते 35 रुपये किलोने विकला जाऊ लागला. त्यामुळे आर्थिक संकटं पाठिशीचं होतं, त्यातून पूजाने पुण्याला जायचा निर्णय घेतला. त्यावेळी, मी जाताना तिला 25 हजार रुपयेही दिले, अशी आपबिती पूजाच्या वडिलांनी मुंबई तकशी बोलताना सांगितली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पूजाच्या मित्राचा फोन आला की, ती बाल्कनीतून खाली पडली, मग मी तत्काळ पुणे गाठले पण तिचा मृत्यू झाला होता, अशी वेदनादायी आप बिती पूजाच्या वडिलांनी सांगितली. 

Pooja Chavan Case : आम्हाला बदनाम करू नका, अन्यथा..., पूजा चव्हाणच्या वडिलांचा संताप

लहू चव्हाण पुढे म्हणाले की, खूप चांगली मुलगी होती,  उगाच बदनाम करत आहेत. असं काही नाही, लोक म्हणतात राजकीय दबावातून तुम्ही बोलत नाही. ज्यावेळी आम्ही पुण्याला गेलो; त्यावेळी आम्ही चौकशी केली. तिच्यासोबत राहणाऱ्या मुलाकडे विचारणा केली. तेव्हा चक्कर येऊन पूजा खाली पडली असं सांगितले. त्यावेळी मी खाली होतो, असं त्या मुलाने सांगितले त्यामुळे मी कोणावर आरोप करू, तिच्या कर्जाचा बोजा होता. उगाच मला बदनाम केले तर मीच आत्महत्या करेन, तेव्हा पूजाच्या आत्महत्येचे राजकारण करू नका, असे आवाहन पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी केले आहे. 

Web Title: Pooja Chavan Case: She took out a loan of Rs 25 lakh, Corona came, etc. Pooja's father made an argument

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.