पूजा चव्हाण प्रकरणातील ज्या ऑडिओ क्लिप सांताक्रुज येथील फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आल्यात त्यामध्ये छेडछाड करण्यात येते की काय?तसेच मनसुख हिरेन यांचे शवविच्छेदन अहवालात ही छेडछाड केली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने या पुराव्यांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी करा, अशी मागणी भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी आज केली.आमदार आशिष शेलार म्हणाले की, ठाकरे सरकारची हेराफेरी सुरुच अजूनही आहे. रोज नवीन हेराफेरी या ठाकरे सरकारच्या काळात सुरू आहे. एका गुन्ह्याला लपवण्यासाठी दुसरा गुन्हा केला जातोय.पूजा चव्हाणप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजिनामा घेण्यात आला. त्यानंतर सचिन वाझे प्रकरण उघड झाले. त्याचा फायदा घेत राठोड प्रकरणातील ऑडिओ क्लीप ज्या सांताक्रूझ येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये छेडछाड सुरु आहे की काय? तो आवाज संजय राठोड यांचा नाहीच असे अहवाल तयार होण्यासाठी पोलीस यंत्रणेमार्फत छेडछाड होण्याची शक्यता आहे.
ठाकरे सरकारची हेराफेरी सुरुच! पूजा चव्हाण, मनसुख हिरेन प्रकरणातील शवविच्छेदन अहवालात छेडछाड?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 2:48 PM
Ashish Shelar Criticised : भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांचा आरोप
ठळक मुद्दे मनसुख हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल तसे शवविच्छेदन करतानाचे रेकोर्डिंग पोलीसांना पुर्णपणे देण्यात आलेले नाही.