Join us  

महाराणा प्रताप बटालियनतर्फे गोडसेंच्या प्रतिमेचे पूजन

By admin | Published: January 31, 2016 1:52 AM

महाराणा प्रताप बटालियनतर्फे नथुराम गोडसेच्या प्रतिमेसह गांधीजींच्या हत्येसाठी वापरलेल्या बंदुकीच्या प्रतिमेचे पूजन करून मानवंदना दिली.

पनवेल : महाराणा प्रताप बटालियनतर्फे नथुराम गोडसेच्या प्रतिमेसह गांधीजींच्या हत्येसाठी वापरलेल्या बंदुकीच्या प्रतिमेचे पूजन करून मानवंदना दिली. संघटनेचे अध्यक्ष अजितसिंग सेंगर यांच्या नेतृत्वाखाली नवीन पनवेल येथील पृथ्वी पार्क सभागृहात हा कार्यक्र म पार पडला.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अजयसिंग सेंगर यांनी सांगितले, की आम्ही गेल्या आठ वर्षांपासून अशाप्रकारच्या कार्यक्र माचे आयोजन करीत आहोत. धर्माच्या आधारे देशाची फाळणी केली गेली व त्या वेळेस जो करार झाला होता, त्या कराराचे पालन केले नाही. त्यामुळे देशात आतंकवाद निर्माण झाल्याचे सेंगर यांनी सांगितले.