राष्ट्रवादीकडून पूनम महाजनांची खिल्ली, संबोधले 'अहो चिऊताई'...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 17:40 IST2019-02-05T17:39:33+5:302019-02-05T17:40:34+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शकुनी मामा आणि मंथरा असल्याची टीका पूनम महाजन यांनी केली होती. पूनम यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसनेही जशास तसे उत्तर दिले आहे.

राष्ट्रवादीकडून पूनम महाजनांची खिल्ली, संबोधले 'अहो चिऊताई'...
मुंबई - पूनम महाजन यांनी केलेली टीका राष्ट्रवादी काँग्रेसला जिव्हारी लागली असून राष्ट्रवादीकडूनही पूनम महाजन यांची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राष्ट्रवादीकडून मुंबई पोस्टरबाजी करण्यात आली असून त्यामध्ये पूनम महाजन यांना चिऊताई म्हटलं आहे. तसेच प्रविणने प्रमोद को क्यों मारा ? असे म्हणत प्रमोद महाजन यांच्या मृत्युबाबत प्रश्न उपस्थित केल्याच दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शकुनी मामा आणि मंथरा असल्याची टीका पूनम महाजन यांनी केली होती. पूनम यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसनेही जशास तसे उत्तर दिले आहे. राष्ट्रवादीने मुंबईती ठिकठिकाणी पोस्टरबाजी करून पूनम महाजन यांच्यावर निशाणा साधला. अहो चिऊ ताई... महाभारत, रामायण यांचे कथानक राहू द्या, देश की जनता यह जानना चाहती है.. प्रविणने प्रमोद को क्यों मारा ? असा प्रश्न पोस्टरच्या माध्यमातून विचारला आहे. रविवारी मुंबईत सीएम चषक स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलताना पूमन महाजन यांनी शरद पवार यांचा उल्लेख महाभारतातील शकुनीमामा आणि रामायणातील मंथरा असा केला होता. त्यानंतर, राष्ट्रवादीकडूनही या टीकेला उत्तर देण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि युवा नेत रोहित पवार यांनीही पूनम महाजन यांना लक्ष्य केलं. रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे पूनम यांना अप्रत्यक्षपणे गांधारी असे संबोधले आहे. तर जितेंद्र आव्हाड यांनीही पूनमताई जरा सांभाळून बोला, सभ्यतेच्या मर्यादा ओलांडू लावू नका, असे म्हणत एक व्हिडीओ शेअर केला आहे.
पूनम महाजन ताई जरा सांभाळून बोला
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 4, 2019
सभ्यतेच्या मर्यादा आम्हाला ओलांडू लावू नका pic.twitter.com/iYlLcBXDgd