Join us

पूनम पांडेला रेप अन् अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी, मुंबई पोलिसांचं लगेच रिप्लाय ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2019 10:43 AM

माझा नंबर मोबाईल अ‍ॅपवरुन सार्वजनिक करण्यात आला आहे,

मुंबई - हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार मारण्यात आले. हैदराबादची घटना ताजी असतानाच बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री पूनम पांडे हिने मुंबई पोलिसांना ट्विट करुन सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. पुनम पांडेने गुगलचे सीईओ सुंदर पिचई आणि मुंबई पोलिसांना आपल्या ट्विटमध्ये मेन्शन केलंय. माझा मोबाईल नंबर तोतियागिरी अॅपवर शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे याची दखल घ्यावी, असे पुनम पांडेनं म्हटलंय. 

माझा नंबर मोबाईल अ‍ॅपवरुन सार्वजनिक करण्यात आला आहे, याबाबत मी गुगलकडे सातत्याने लेखी तक्रार दिलीय. पण, कुठलिही कारवाई झाली नाही. मला, बलात्कार आणि अॅसिड हल्ल्याच्या धमक्या मिळत आहेत. त्यामुळे मी दिवसांतील 24 तास भितीदायक वातावरणात जगत आहे. सर, तरी आपण मला मदत करा, असे पूनम पांडेने आपल्या ट्विटमध्ये लिहलं आहे. आज सकाळीच पूनमने हे ट्विट केलं असून त्यानंतर काही वेळातच मुंबई पोलिसांनी पूनम पांडेच्या ट्विटला रिप्लाय दिला. आम्ही तुमच्या विनंती दखल घेत आहोत. तुमच्या संपर्क क्रमांकाबद्दल आम्हाला (DM) थेट मेसेज करा, असे मुंबई पोलीस आयुक्तांच्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे. 

दरम्यान, हैदराबादमधील बलात्कार प्रकरणामुळे देश हादरुन गेला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी केवळ 8 दिवसांतच याप्रकरणातील चारही आरोपींचा एन्काऊंटर केला आहे. त्यातच, अभिनेत्री पूनम पाडेंनीही बलात्कार आणि अॅसिड हल्ल्याची भिती व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलिसांनीही तात्काळ उत्तर देत, आपली भूमिका बजावली असून आपण दखल घेत असल्याचं म्हटलंय. 

टॅग्स :पूनम पांडेबॉलिवूडबलात्कारपोलिसहैदराबाद प्रकरण