लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शासकीय रुग्णालयांत उपचार घेण्यासाठी जाणारे बरेचसे रुग्ण आपला चुकीचा संपर्क क्रमांक नोंदवितात, अशी माहिती नुकतीच केंद्र शासनाने दिली आहे. या चुकीच्या संपर्क क्रमांकामुळे आरोग्य सेवेतील सुधारणाविषयी प्रतिसादास अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे.या अॅपच्या माध्यमातून काही आकडेवारी संकलित करण्यात आली आहे. त्यानुसार, ११ राज्यांतील शासकीय रुग्णालयांत गेल्या वर्षी सप्टेंबरपासून ते एप्रिल २०१७पर्यंत करण्यात आलेल्या नोंदणीनुसार १ कोटी २ लाख १२ हजार ६२ रुग्ण आले होते. त्यातील केवळ ३० टक्के रुग्णांनी आपल्या योग्य संपर्क क्रमांकाची माहिती रुग्णालय प्रशासनाला दिली.१ कोटींपैकी ३ लाख ८७ हजार ७३८ रुग्णांनी म्हणजे केवळ ११ टक्के रुग्णांनी आरोग्य सेवांविषयी ‘मेरा अस्पताल’च्या माध्यमातून विचारण्यात आलेल्या प्रश्नांना प्रतिसाद दिला. या अॅपच्या माध्यमातून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची वागणूक, मिळणारी सेवा आणि रुग्णालयातील स्वच्छता अशा विविध मुद्द्यांविषयी प्रतिसाद देण्यात येतो. गेल्या वर्षी केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते आरोग्य विभागाच्या अंतर्गत ‘मेरा अस्पताल’ या अॅपचे अनावरण केले होते. या योजनेच्या माध्यमातून रुग्णांकडून आरोग्य सेवेतील त्रुटी जाणून घेऊन त्यात सुधारणा करण्याचा उद्देश आहे. गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात ही योजना सुरू करण्यात आली. बिहार, मध्य प्रदेश, दिल्ली आणि राजस्थानसह ११ राज्यांत ही सेवा कार्यरत आहे. रुग्णांकडून देण्यात येणाऱ्या चुकीच्या माहितीमुळे आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे या योजनेचा उद्देश लक्षात घेऊन रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनी सरकारला पूर्ण सहकार्य करावे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागाने दिली.गेल्या वर्षी केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते आरोग्य विभागाच्या अंतर्गत ‘मेरा अस्पताल’ या अॅपचे अनावरण केले होते. या योजनेच्या माध्यमातून रुग्णांकडून आरोग्य सेवेतील त्रुटी जाणून घेऊन त्यात सुधारणा करण्याचा उद्देश आहे. गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात ही योजना सुरू करण्यात आली. बिहार, मध्य प्रदेश, दिल्ली आणि राजस्थानसह ११ राज्यांत ही सेवा कार्यरत आहे.
रुग्ण देतात चुकीचा संपर्क क्रमांक
By admin | Published: May 07, 2017 6:40 AM