संक्रमण शिबिरातही जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 03:13 AM2017-08-05T03:13:39+5:302017-08-05T03:13:52+5:30

ताडदेवच्या एमपी मिल कंपाउंडमधील अखेरची घटका मोजणाºया संक्रमण शिबिरातील १७ वर्षे जुन्या इमारतीत सुमारे ४० रहिवासी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत जीव मुठीत घेऊन राहत आहेत.

 Poor living in the transit camp | संक्रमण शिबिरातही जीव टांगणीला

संक्रमण शिबिरातही जीव टांगणीला

Next

मुंबई : ताडदेवच्या एमपी मिल कंपाउंडमधील अखेरची घटका मोजणा-या संक्रमण शिबिरातील १७ वर्षे जुन्या इमारतीत सुमारे ४० रहिवासी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत जीव मुठीत घेऊन राहत आहेत. तर येथील डझनभर इमारती उभारल्यानंतरही रहिवाशांसाठी आवश्यक समाज कल्याण केंद्र आणि बालवाडी मात्र अद्याप उभारली नसल्याचा आरोप शिवसंकल्प जनजागृती मंचाने केला आहे.
शिवसंकल्प जनजागृती मंचाचे उपाध्यक्ष जयराज खाडे यांनी सांगितले की, अद्याप एमपी मिल कंपाउंडमधील सुमारे १५०हून अधिक आणि जनता हिलमधील ११० रहिवाशांचे पुनर्वसन झालेले नाही. एमपी मिल कंपाउंडमधील सुमारे ४० रहिवासी जुन्या संक्रमण शिबिरात जीव धोक्यात घालून राहत असून, ५८ रहिवासी म्हाडाने १९८५ साली उभारलेल्या संक्रमण शिबिरात खितपत पडलेले आहेत. म्हाडाने उभारलेल्या संक्रमण शिबिरातील जनता हिलमधील रहिवाशांमध्येही पुनर्वसनाबाबत साशंकता आहे. कारण, म्हाडामधील १६८, जुन्या संक्रमण शिबिरातील सुमारे ४० आणि रोख भाडे घेऊन बाहेर राहणाºयांची संख्या २५०च्या घरात आहे. याशिवाय प्रकल्पग्रस्त (पीएपी) रहिवाशांना २०० घरे उभारावी लागणार आहेत. मात्र, २१ मजली इमारतीमधील १२८ घरे वगळता, इतर घरांबाबत संभ्रम आहे. त्यामुळे आणखी किती काळ संक्रमण शिबिरात रहायचे? असा प्रश्न रहिवासी विचारत आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे, येथील नव्या जायफळवाडीमधील इमारतींचे बांधकाम निकृष्ट असल्याचा शेरा एसआरए अधिकाºयांनी लगावल्याचा गंभीर आरोपही मंचाने केला. मंचाचे उपखजिनदार सुरेंद्र नयकर म्हणाले की, जायफळवाडीच्या २ विंगमध्ये एकूण ५०० रहिवासी राहतात. मात्र, अवघ्या काही वर्षांत गळतीच्या समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या इमारतींना आग लागल्यास अग्निशमन दलाची गाडी वळवण्याइतपत जागाही या ठिकाणी शिल्लक ठेवलेली नाही.
मेहतांच्या घरावर आज मोर्चा
एसआरए घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप करत, मुंबई काँग्रेसने गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. त्यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्या नेतृत्वाखाली मेहता यांच्या घाटकोपर येथील निवासस्थानाबाहेर शनिवारी, दुपारी मोर्चा काढण्यात येणार आहे.

Web Title:  Poor living in the transit camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.