मुंबई-मतदात्यामधे उत्साह असूनही मतदान अघिकारी मतदान करवून घेण्यात उत्साही नव्हते. ते मतदानाचा टक्का वाढवण्यात कमी पडत होते, मतदार किमान एक ते सव्वा तास रांगा लावूनही नंबर लागत नव्हता. याचा अनुभव स्वत: राज्याचे माजी आरोग्य मंत्री व कुपोषण निर्मूलन टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष( मंत्री दर्जा ) डॉ.दीपक सावंत यांना आला.
त्यामुळे निवडणूक आयोगाने सर्व आस्थापनातून निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना पूर्व ट्रेनिंग देऊन काय मिळवले असा आता प्रश्न आता मतदारांनी विचारायला सुरूवात केल्याची माहिती त्यांनी दिली. याबाबत त्यांनी सविस्तर माहिती देतांना सांगितले की,सान्ताक्रूझ पश्चिम टॅंक लेन मधील अनुभव वाईट होता. कारण मतदान बूथ हे शाळेच्या वर्गात होते व वर्गाच्या चिंचोळ्या जागेत ४ मतदान बूंथच्या रांगा आणि फॅन फक्त दोन. परिणामी मतदार घामाने ओले चिंब होऊन निथळत होते त्यातून सिनियर सिटीझनच्या नावाखाली मधेच प्रवेश घेत होते, त्यामुळे नवमतदार मध्यम वयीन घरची वाट धरत होते.
या सर्वातून निवडणूक आयोगाने धडा घेतला पाहिजे. सिनियर सिटीझन सिटीझन साठी वेगळे बूथ असावेत. एअर कडिंशन या वातावरणात काम करण्याची सवय असल्याने. अनेक अधिकारी व कर्मचारी निवडणूक केंद्रावर काम करणे ही शिक्षा मानतात, त्यामुळे अनेक प्रश्न उभे राहतात असे मत डॉ.दीपक सावंत यांनी व्यक्त केले.