माघी गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींचा वापर करता येणार, मूर्तीकार, कारागीरांना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 07:28 PM2021-01-12T19:28:01+5:302021-01-12T19:28:54+5:30

Maghi Ganeshotsav News : पीओपी वापर व पर्यावरणावर होणारे परिणाम याबाबत अभ्यास करण्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्यात आल्याने या कमिटीचा अहवाल येईपर्यंत पीओपीवरील बंदी स्थगित करण्यात यावी असे निर्देश आज केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले.

POP statues can be used in Maghi Ganeshotsav, great relief to sculptors, artisans | माघी गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींचा वापर करता येणार, मूर्तीकार, कारागीरांना मोठा दिलासा

माघी गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींचा वापर करता येणार, मूर्तीकार, कारागीरांना मोठा दिलासा

Next

मुंबई - पीओपी वापर व पर्यावरणावर होणारे परिणाम याबाबत अभ्यास करण्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्यात आल्याने या कमिटीचा अहवाल येईपर्यंत पीओपीवरील बंदी स्थगित करण्यात यावी असे निर्देश आज केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सचिव प्रशांत गार्गव्ह यांना दिले आहेत.त्यामुळे माघी गणेशोत्सवात पीओपीच्या मुर्तीवर बंदी राहणार नाही, अशी माहिती भाजपा नेते आमदार  आशिष शेलार यांनी दिली. 

महाराष्ट्रातील सुमारे 5 लाख मुर्तीकार, कारागीरांचे गाऱ्हाणे आज  पुन्हा भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे मांडले. महाराष्ट्रात माघी गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आहे त्यामुळे याबाबत तोडगा काढावा अशी विनंती आमदार शेलार यांनी मंत्री जावडेकर यांना केली.

Web Title: POP statues can be used in Maghi Ganeshotsav, great relief to sculptors, artisans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.