लोकप्रिय हापूस आंबा बाजारात दाखल; पण आवक कमी असल्याने भाव वधारले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2022 08:26 PM2022-04-20T20:26:23+5:302022-04-20T20:30:02+5:30

आंब्याचे दर 5 ते 6 डजन पेटीचे 7 ते 8 हजार आहेत.

Popular hapus mangoes enter the market; But due to low income, prices went up | लोकप्रिय हापूस आंबा बाजारात दाखल; पण आवक कमी असल्याने भाव वधारले 

लोकप्रिय हापूस आंबा बाजारात दाखल; पण आवक कमी असल्याने भाव वधारले 

googlenewsNext

मुंबई- सगळ्यांना प्रिय असा हापूस आंबाबाजारात दाखल झाला आहे. महात्मा फुले मंडई, कॉर्फर्ड मार्केट येथे कोकणातला तसेच कर्नाटकहून हापूस आंबा आला आहे. वर्षभर प्रतीक्षा करून उन्हाळ्यात सामान्य लोक आंबा खरेदी करतात. आणि तो आपल्याला योग्य भावात मिळावा अशी अपेक्षा करतात. परंतु दरवर्षीच्या तुलनेत आंब्यांची आवक कमी असल्याने आंब्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे आंबा घेण्यासाठी बाजारात तुरळक गर्दी पाहायला मिळाली. 

आंब्याचे दर 5 ते 6 डजन पेटीचे 7 ते 8 हजार आहेत. आणि प्रतिडजन 1000 ते 2000 पर्यंत असे दर आहेत. हापूस उत्पादक जिल्ह्यात अवेळी पाऊस पडल्याने फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आंबा महाग झाला आहे आणि महागाई असल्याने ग्राहक कमी आंबा खरेदी करत आहेत, असे आंबा विक्रेत्यांचे म्हणणे आहे. 

Web Title: Popular hapus mangoes enter the market; But due to low income, prices went up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.