Join us

ऑर्केस्ट्रा बारमध्ये अश्लील डान्स, 2 बारवर पोलिसांची धाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 20:14 IST

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मीरा गावठाण येथे असलेल्या मॅडनेस सिटी ऑर्केस्ट्रा बार वर बुधवारी रात्री ११ नंतर धाड टाकण्यात आली.

मीरारोड - काशीमीरा पोलिसांनी महामार्गावरील २ ऑर्केस्ट्रा बारवर अश्लील नाचगाण्याप्रकरणी धाडी टाकून ३६ जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे हद्दीत चालणाऱ्या ऑर्केस्ट्रा बा मधील अनैतिक-अश्लील प्रकारांविरुद्ध ह्या धाडी टाकण्यात आल्या आहेत. 

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मीरा गावठाण येथे असलेल्या मॅडनेस सिटी ऑर्केस्ट्रा बार वर बुधवारी रात्री ११ नंतर धाड टाकण्यात आली. त्या धाडीत ९ बार कर्मचारी व ६ गिऱ्हाईक यांना पकडण्यात आले. बारमध्ये महिलांकडून अश्लील नाच करवून घेतले जात असल्याने याप्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मंगळवारी रात्री पोलिसांच्या पथकाने महामार्गावरील मिलेनियम २००० ह्या ऑर्केस्ट्रा बार वर धड टाकली.  सदर धाडीत बारबाला अश्लील नृत्य व हावभाव करत असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला . बारचा मालक विशवनाथ शेट्टी, चालक नितीन शेट्टी सह ६ बार कर्मचारी , ७ बारबाला व ८ ग्राहक यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . ऑर्केस्ट्रा बारच्या आड सातत्याने चालणाऱ्या बेकायदा नाच व अश्लील प्रकारां मुळे ठोस कारवाई सह परवाने रद्द करण्याची तसेच बेकायदा बांधकाम पाडून टाकण्याची मागणी होत आहे.  

टॅग्स :पोलिसगुन्हेगारी