मुंबई : विलेपार्ले येथील एका नामांकित महाविद्यालयातील ऑनलाइन वर्ग सुरू असताना अचानक पॉर्न व्हिडिओ लागल्याने खळबळ उडाली. हॅकर्सने यंत्रणा हॅक करून पॉर्न व्हिडिओ लावल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी नुकताच गुन्हा नोंदवत असला अधिक तपास सुरू केला आहे.
ऑनलाइन वर्ग सुरू असताना अचानक पॉर्न व्हिडिओ लागला. त्यामुळे एकच गाेंधळ उडाला. शिक्षकांनी प्रसंगावधान राखत ताे तत्काळ बंद केला. मात्र, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, महाविद्यालयीन प्रशासनाने तत्काळ याप्रकरणी पोलिसांत धाव घेतली. गेल्या काही दिवसांपासून सायबर बुलिंगसाठी काही जण ऑनलाइन अश्लील कृत्य करणे, अश्लील संभाषण करणे, शिक्षकांना शिवीगाळ करणे, असे प्रकार करत आहेत. केवळ मौजमजेसाठी असे प्रकार घडत असल्याचे काही प्रकरणांतून उघडकीस आले आहे. त्यामुळे असे प्रकार घडत असल्यास तत्काळ तक्रार करावी, असे आवाहन सायबर विभागाकडून करण्यात आले आहे. याबाबत ते अधिक तपास करत आहेत.