महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या माध्यमातून पोर्ट ट्रस्टचा चेहरामोहरा बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 04:19 AM2018-12-29T04:19:21+5:302018-12-29T04:19:47+5:30

मालवाहू जहाजांची गर्दी असलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्टचे चित्र बदलून जल पर्यटनाच्या माध्यमातून जागतिक दर्जाची सेवा उपलब्ध करण्याकडे मुंबई पोर्ट ट्रस्टने लक्ष केंद्रित केले आहे.

Port Trust's face will change through ambitious projects | महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या माध्यमातून पोर्ट ट्रस्टचा चेहरामोहरा बदलणार

महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या माध्यमातून पोर्ट ट्रस्टचा चेहरामोहरा बदलणार

googlenewsNext

- खलील गिरकर

मुंबई : मालवाहू जहाजांची गर्दी असलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्टचे चित्र बदलून जल पर्यटनाच्या माध्यमातून जागतिक दर्जाची सेवा उपलब्ध करण्याकडे मुंबई पोर्ट ट्रस्टने लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईच्या पूर्व किनारपट्टीचा चेहरामोहरा बदलणाऱ्या महत्त्वपूर्ण योजनेवर युद्धपातळीवर काम केले जात आहे. नवीन वर्षात यापैकी अनेक प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे.

सध्या ४ हजार ५७९ कोटी रुपये खर्चून मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे विविध प्रकल्प राबवण्यात येत आहेत. विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा विभाग राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या आकर्षणाचा मुंबईतील केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे. जल पर्यटनासाठी महत्त्वपूर्ण ठरणाºया आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनलचा कायापालट करण्यात येणार असून विमानतळाप्रमाणे क्रुझ टर्मिनलची निर्मिती करण्यात येत आहे. वर्षभरात २०० प्रवासी जहाजे व ७ लाख प्रवाशांचे व्यवस्थापन करण्याची क्षमता तयार केली जात आहे. तळमजला अधिक ३ मजल्यांची क्रुझ पद्धतीची इमारत उभारण्यात येणार आहे. यामध्ये ४ लाख १५ हजार चौ.फू. जागा उपलब्ध होईल. त्यापैकी १ लाख ७ हजार चौ.फू. जागा प्रत्यक्ष आॅपरेशनल कामासाठी उपलब्ध असेल. ३० जूनपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. या कामासाठी ३०० कोटी खर्च अपेक्षित आहे.

पर्यटकांसाठी २ तरंगती उपाहारगृहे सुरू करण्यात आली आहेत. पुढील वर्षी गिरगाव चौपाटी येथे एका तरंगत्या उपाहारगृहाची सेवा सुरू करण्यात येणार आहे. मुंबई परिसरातील जलवाहतूक क्षेत्रातील समस्यांना सोडवण्यासाठी गेट वे आॅफ इंडियापासून १३ नॉटिकल अंतरावर कान्होजी आंग्रे हे बेट वसवण्यात येत आहे. त्याची जोरदार तयारी सुरू आहे. या वर्षात हे काम पूर्ण होईल, असा दावा करण्यात आला आहे.

२३० कोटी खर्चून मरीना प्रकल्प राबवण्यात येत आहे. २०१९ च्या अखेरीस हे काम पूर्ण होईल असा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये १५ हजार २७३ चौ. मीटर जागा उपलब्ध होईल व त्यामध्ये २३५ ते २८० यॉट येतील, अशी अपेक्षा आहे.

सध्या राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबईतील नागरिकांच्या व मुंबईत येणाºया नागरिकांच्या जलपर्यटनाची सुविधा उपलब्ध होईल. मुंबई आकर्षणाचे केंद्र बनेल असा विश्वास आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा येथे तयार केल्या जात आहेत. या परिसराचा चेहरामोहरा बदलणारे हे प्रकल्प आहेत. पुढील काही वर्षांत टप्प्याटप्प्याने हे प्रकल्प पूर्ण होतील. मुंबईतील व देशातील अनेक नागरिक उच्च दर्जाच्या अनेक पर्यटन सुविधांसाठी परदेशवारी करतात. त्यांना मुंबईत या सुविधा उपलब्ध करून आपल्याकडे आकर्षित करण्याचा आमचा प्रयत्न आहे व आम्ही त्यामध्ये यशस्वी होऊ
- संजय भाटिया,
अध्यक्ष, मुंबई पोर्ट ट्रस्ट

Web Title: Port Trust's face will change through ambitious projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई