सकारात्मक ! मुंबईत दिवसभरात आढळले सहाशे रुग्ण; कोरोनामुक्तांची संख्या पाच हजारांहून अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:06 AM2021-06-01T04:06:46+5:302021-06-01T04:06:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून मुंबई बरी होत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईत मे महिन्याच्या अखेरीस ...

Positive! Six hundred patients found in Mumbai during the day; The number of coronamuktas is more than five thousand | सकारात्मक ! मुंबईत दिवसभरात आढळले सहाशे रुग्ण; कोरोनामुक्तांची संख्या पाच हजारांहून अधिक

सकारात्मक ! मुंबईत दिवसभरात आढळले सहाशे रुग्ण; कोरोनामुक्तांची संख्या पाच हजारांहून अधिक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून मुंबई बरी होत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईत मे महिन्याच्या अखेरीस सोमवारी रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. दिवसभरात ६७६ रुग्णांचे निदान झाले असून, २९ मृत्यूंची नाेंद झाली. दुसरीकडे पाच हजार ५७० रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत एकूण सहा लाख ६६ हजार ७९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

सध्या २२ हजार ३९० रुग्ण उपचाराधीन आहेत. यात १९ हजार ९० लक्षणविरहित आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९४ टक्के आहे, तर रुग्ण दुपटीच्या कालावधीने चारशेचा टप्पा ओलांडला असून ताे ४३३ दिवसांवर पोहोचला आहे. २४ ते ३० मेपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.१५ टक्के आहे. मुंबईत साेमवारी दिवसभरात १७ हजार ८६५, तर आतापर्यंत एकूण ६२ लाख ७१ हजार ७४३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७ लाख ६ हजार २५१ असून, मृतांचा आकडा १४ हजार ८८४ आहे. शहर, उपनगरातील झोपडपट्ट्या आणि चाळीत ३६ सक्रिय कंटेन्मेंट झोन्स आहेत. मागील चोवीस तासांत पालिकेने रुग्णांच्या संपर्कातील ९ हजार १४२ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे. सध्या ८९९ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात, तर २ लाख ८२ हजार ६३७ व्यक्ती गृह अलगीकरणात आहेत.

............................................

Web Title: Positive! Six hundred patients found in Mumbai during the day; The number of coronamuktas is more than five thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.