महाआघाडीबाबत सकारात्मक चर्चा - खा.अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 04:26 AM2018-08-12T04:26:09+5:302018-08-12T04:26:30+5:30

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाविरोधात धर्मनिरपेक्ष समविचारी पक्षांना सोबत घेऊन महाआघाडी करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून इतर समविचारी पक्षांशी लवकरच चर्चा करून महाआघाडीचा निर्णय घेऊ

Positive Talks about MahaAghadhi - Khash. Ashok Chavan | महाआघाडीबाबत सकारात्मक चर्चा - खा.अशोक चव्हाण

महाआघाडीबाबत सकारात्मक चर्चा - खा.अशोक चव्हाण

Next

मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाविरोधात धर्मनिरपेक्ष समविचारी पक्षांना सोबत घेऊन महाआघाडी करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून इतर समविचारी पक्षांशी लवकरच चर्चा करून महाआघाडीचा निर्णय घेऊ, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली.
चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. ते म्हणाले, लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीआय, सीपीएम, शेतकरी कामगार पक्ष, बहुजन समाज पक्ष, भारिप बहुजन महासंघ, समाजवादी पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, पीपल्स रिपब्लिकन पक्ष, रिपब्लिकन पक्ष (गवई) व अन्य धर्मनिरपेक्ष समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याबाबत चर्चा झाली आहे.

Web Title: Positive Talks about MahaAghadhi - Khash. Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.