कोळीवाड्यासाठी विशेष धोरण आखण्याबाबत सकारात्मक काम सुरू-खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

By मनोहर कुंभेजकर | Published: June 26, 2023 08:14 PM2023-06-26T20:14:26+5:302023-06-26T20:16:38+5:30

मुंबई -  मुंबईतील कोळीवाड्यातील घरे छोटी झाली असून कुटुंबे मात्र कोळी बांधवांची कुटुंब मोठी झाली आहेत. त्यांना चांगले घर ...

Positive work on designing a special policy for Koliwada - Special Dr. Shrikant Shinde | कोळीवाड्यासाठी विशेष धोरण आखण्याबाबत सकारात्मक काम सुरू-खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

कोळीवाड्यासाठी विशेष धोरण आखण्याबाबत सकारात्मक काम सुरू-खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

googlenewsNext

मुंबईमुंबईतील कोळीवाड्यातील घरे छोटी झाली असून कुटुंबे मात्र कोळी बांधवांची कुटुंब मोठी झाली आहेत. त्यांना चांगले घर मिळावे यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. मुंबईतील खरा भुमीपुत्र आगरी व कोळी आहे. कोळीवाड्यासाठी विशेष धोरण आखण्याबाबत सकारात्मक काम सुरू आहे.मुख्यमंत्र्यांनी याबाबत आश्वासन दिले आहे. एसआरए व म्हाडामध्ये हक्काचे घर मिळतील, यादृष्टीने विचार सुरू असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काल वेसावे कोळीवाड्यात केले.ठाण्याप्रमाणे आम्ही मुंबईत देखील काम करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

येथील शिवसेना शाखा क्रमांक ५९ येथे आयोजित केलेल्या शाखा संपर्क कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार गजानन कीर्तीकर, नरेश म्हस्के, सिद्धेश कदम, सुशांत शेलार, अमेय घोले,शिंदे गटाचे वर्सोवा-अंधेरी विभागप्रमुख अल्ताफ पेवेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कोविड काळात सर्वसामान्य नागरिक जीव वाचवण्यासाठी आटापीटा करत असताना मुंबई महापालिकेत मात्र त्यांना लुटण्याचे काम सुरू होते. त्यावेळी बॉडीबॅग ठाण्यात अवघ्या ३५० रुपयांना मिळत असताना, त्याच बॅगेसाठी मुंबई महापालिका तब्बल ६ हजार ७०० रुपये का मोजत होती, असा सवाल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला.

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असे बिरुद मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेची आशिया खंडातील सर्वात भ्रष्ट महापालिका अशी ओळख, उद्धव ठाकरे यांच्या कारकीर्दीत झाली असल्याचा आरोप त्यांनी केला. कोविड काळात एकीकडे माणसे मरत होती व हे मात्र त्यांना लुटायचे काम करत होते, इतकी वर्षे उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात महापालिका असतानाही मुंबईकरांच्या, मराठी माणसांच्या आयुष्यात फारसे बदल घडलेले दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली.

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करण्याऐवजी आधी आपल्या पालिकेतील कार्यकाळाचे उत्तर जनतेला द्यावे. आमच्यावर खोके खोके असा आरोप करणाऱ्यांनी कुणाला किती खोके मिळाले, हे लवकरच एसआयटीच्या चौकशीतून समोर येईल हे विसरू नये. ईडीच्या चौकशीत सूरज चव्हाण, सुजीत पाटकर यांचे धागेदोरे कुणापर्यंत गेले आहेत, हे स्पष्ट होईल.मुख्यमंत्री  स्वतः सक्रिय असल्याने भ्रष्ट अधिकाऱ्यांना बाजूला सारून मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार बंद करण्यास त्यांनी प्राधान्य दिले आहे अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: Positive work on designing a special policy for Koliwada - Special Dr. Shrikant Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.