‘व्हीव्हीपॅट’मुळे लोकसभेचा निकाल लांबण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 05:17 AM2019-05-20T05:17:22+5:302019-05-20T05:17:35+5:30

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील पावत्यांच्या बेरजेची होणार पडताळणी

The possibility of the Lok Sabha election to be removed due to VVPAT | ‘व्हीव्हीपॅट’मुळे लोकसभेचा निकाल लांबण्याची शक्यता

‘व्हीव्हीपॅट’मुळे लोकसभेचा निकाल लांबण्याची शक्यता

Next

मुंबई : देशभरात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी २३ रोजी होणार आहे. यंदापासून मतमोजणीवेळी प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघातील व्हीव्हीपॅट यंत्रातील पावत्याही मोजल्या जाणार असल्याने प्रत्यक्ष निकाल हाती तीन ते चार तास विलंब लागण्याची शक्यता निवडणूक अधिकारी वर्तवत आहेत. त्यामुळे विजयी उमेदवारांना निवडणूक आयोगाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत वाट पहावी लागण्याची शक्यता आहे.


यंदाच्या निवडणुकीपासून प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील एका विधानसभा मतदानकेंद्रावर ईव्हीएम यंत्रणेसोबतच व्हीव्हीपॅट मशीन लावण्यात आले. त्यामुळे आपण मत दिलेल्या उमेदवारालाच मत दिले गेले की नाही, याची खातरजमा मतदारांना त्याचवेळी करता आली. मात्र, विरोधी पक्षांनी गेल्या निवडणुकीप्रमाणेच यंदाही इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीवरच आक्षेप घेत, सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएम यंत्रात स्व-इच्छेनुसार फेरबदल केल्याचा आरोप केला. शिवाय ५० टक्के व्हीव्हीपॅट यंत्रातील पावत्यांची मोजणी केली जावी, यासाठी आधी निवडणूक आयोग आणि नंतर सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल केली.


सर्वाेच्च न्यायालयाने विरोधकांची ही मागणी फेटाळत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदानकेंद्रातील व्हीव्हीपॅट यंत्रातील पावत्या मोजण्याची अनुमती दिली. याचाच अर्थ येत्या २३ तारखेला प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील ३० मतदानकेंद्रातील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रणेतील पावत्यांच्या बेरजेची पडताळणी होणार आहे.


व्हीव्हीपॅटमधील पावत्यांची मोजणी हाताने केली जाणार असल्याने त्यासाठी विलंब लागण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार एका व्हीव्हीपॅटमधील पावत्या मोजण्यास किमान एक तास लागू शकतो. या अनुमानानुसार पाच मतदारसंघातील व्हीव्हीपॅटमधील पावत्यांच्या गणनेसाठी किमान तीन ते चार तासांचा अवधी लागू शकतो. त्यामुळे दुपारनंतर कल समजू लागले, तरी अंतिम आकडेवारी रात्री दहा वाजल्यानंतरच कळू शकेल, असा निवडणूक अधिकाºयांचा अंदाज आहे.

बँकेतील कॅशियरप्रमाणे केबिन
व्हिव्हीपॅटमधील पावत्यांची मोजणी हाताने केली जाणार असल्यामुळे ही मते मोजणाºया अधिकाºयांसाठी मतमोजणी केंद्रावर बँकेतील कॅशियरप्रमाणे केबिनची व्यवस्था केली जाणार आहे. पावत्या गहाळ होऊ नयेत, यासाठी मत मोजणाºया अधिकाºयावर त्याच्या वरिष्ठ अधिकाºयाचे बारीक लक्ष असेल. या व्यतिरिक्त १३ लाख सरकारी नोकरांनी इलेक्ट्रॉनिक पोस्टल बॅलेट सिस्टिमव्दारे मतदानाचा हक्क बजावला असल्याने त्या मतांची गणना करतानाही बराच वेळ लागेल.

अधिकाºयांना प्रशिक्षण
व्हिव्हीपॅटमधील पावत्यांची मोजणी कशी करावी, ईव्हीएम आणि व्हिव्हीपॅट मशिनमधील आकडेवारीत तफावत आढळून आल्यास काय करावे, शिवाय मतमोजणीवेळी काही तांत्रिक अडचणी आल्यास काय करावे, याबाबत निवडणूक आयोगातर्फे सोमवारी, २१ मे रोजी ८ ते १ या वेळेत सर्व राज्यांतील निवडणूक अधिकाºयांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच यंदा मतमोजणीसाठी दरवर्षीच्या तुलनेत अधिकाºयांच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे.

बँकेतील कॅशियरप्रमाणे केबिन
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील पावत्यांच्या संख्येत तफावत आढळल्यास त्या त्या ठिकाणच्या नोंदी निवडणूक आयोगाला कळविण्यात येतील. त्यानंतर निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी त्याबाबत निर्णय घेतील. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील पावत्यांची संख्या जुळल्याशिवाय संबंधित लोकसभा मतदारसंघातील निकाल जाहीर केला जाणार नाही. त्यामुळे एका विधानसभा मतदारसंघामुळे संपूर्ण मतदारसंघाचा निकाल रखडण्याची शक्यता आहे.

च्२०१४च्या निवडणुकीत देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी केवळ आठ मतदारसंघात ईव्हीएमसोबतच व्हीव्हीपॅट यंत्राचा प्रयोग करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी व्हीव्हीपॅटमधील पावत्यांची मोजणी केली गेली नव्हती. त्यामुळे निकाल वेळेत लागला होता.

Web Title: The possibility of the Lok Sabha election to be removed due to VVPAT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.