गणेशोत्सवात विशेष गाड्यांची संख्या वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 05:17 AM2019-05-28T05:17:13+5:302019-05-28T05:17:20+5:30

गणेशोत्सवानिमित्त कोकण आणि मध्य रेल्वे मार्गावरून १६६ विशेष मेल, एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहेत.

 The possibility of the number of special trains in Ganesh Festival | गणेशोत्सवात विशेष गाड्यांची संख्या वाढण्याची शक्यता

गणेशोत्सवात विशेष गाड्यांची संख्या वाढण्याची शक्यता

Next

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकण आणि मध्य रेल्वे मार्गावरून १६६ विशेष मेल, एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहेत. सीएसएमटी, दादर, पनवेल आणि पुणे स्थानकावरून करमळी, सावंतवाडी, रत्नागिरी आणि पेडणे या स्थानकापर्यंत जाण्यासाठी विशेष मेल, एक्स्प्रेस चालविण्यात निर्णय कोकण आणि मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मात्र प्रवाशांची संख्या जास्त असल्याने विशेष गाड्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कोकणातून प्रवास करण्यासाठी जनशताब्दी, मांडवी, कोकणकन्या, तुतारी या मेल, एक्स्प्रेस प्रसिद्ध आहेत. या गाड्यांची प्रतिक्षा यादी ३०० पेक्षा जास्त असते. त्यामुळे या गाड्यांची गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने विशेष गाड्यांची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
यावर्षी गणेशोत्सव २ सप्टेंबर रोजी आहे. यामुळे कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी होते. याच पार्श्वभूमीवर १७ मे रोजी गणेशोत्सवानिमित्त १६६ विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. या गाड्यांची तिकिटे लवकर संपल्याचे इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संकेतस्थळावरून दिसून येते.
३१ आॅगस्ट आणि १, २ सप्टेंबर या दिवशी गाडी क्रमांक ०१००१ मुंबई ते सावंतवाडी, गाडी क्रमांक ०१०३३ मुंबई-रत्नागिरी-पनवेल आणि पनवेल-सावंतवाडी या विशेष मेल, एक्स्प्रेसची प्रतिक्षा यादी २०० ते ३०० पर्यंत गेली आहे.

Web Title:  The possibility of the number of special trains in Ganesh Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.