मध्य रेल्वेवरील पहिली राजधानी १९ जानेवारीपासून धावण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 06:08 AM2019-01-17T06:08:57+5:302019-01-17T06:09:05+5:30

मुंबई : मध्य रेल्वेवरील पहिली राजधानी एक्स्प्रेस (मुंबई-दिल्ली) शनिवार, १९ जानेवारीपासून धावणार असल्याची शक्यता रेल्वेतील सूत्रांनी वर्तवली आहे. मात्र, ...

The possibility of running the first capital on the Central Railway from January 19th | मध्य रेल्वेवरील पहिली राजधानी १९ जानेवारीपासून धावण्याची शक्यता

मध्य रेल्वेवरील पहिली राजधानी १९ जानेवारीपासून धावण्याची शक्यता

Next

मुंबई : मध्य रेल्वेवरील पहिली राजधानी एक्स्प्रेस (मुंबई-दिल्ली) शनिवार, १९ जानेवारीपासून धावणार असल्याची शक्यता रेल्वेतील सूत्रांनी वर्तवली आहे. मात्र, या दिवशी काही अडथळे आल्यास ती २६ जानेवारीपासून सुरू केली जाणार आहे. ही एक्स्प्रेस नाशिकमार्गे दिल्लीला रवाना होईल.


ही एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून नाशिकमार्गे हजरत निझामुद्दिन (दिल्ली) चालविण्यात येणार आहे. या
गाडीला कल्याण, नाशिक, जळगाव, भोपाळ, झाशी जंक्शन, आग्रा
या स्थानकांवर थांबा घेण्यात येणार आहे. ती सीएसएमटी येथून दर बुधवारी आणि शनिवारी सुटेल,
तर मंगळवार आणि रविवारी निझामुद्दिन येथून मुंबईसाठी रवाना होईल. मध्य रेल्वेवरील राजधानीची देखभाल मुंबई सीएसएमटी येथील वाडी बंदर येथे करण्यात येणार असून, या एक्स्प्रेसला १५ बोगी असणार आहेत.


रेल्वे बोर्डाची मंजुरी
दिल्ली आणि मुंबई या दोन राजधान्यांचा दुवा नाशिक असणार आहे. राजधानी एक्स्प्रेस नाशिकमार्गे मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस चालविण्यासाठी रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. या गाडीमुळे मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव या महत्त्वाच्या जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. बुधवारी आणि शनिवारी गाडी क्र. २२२२१ सीएसएमटी ते निझामुद्दिन राजधानी एक्स्प्रेस सकाळी २.२० वाजता सुटेल. गुरुवारी आणि रविवारी गाडी क्र. २२२२२ निझामुद्दिन ते सीएसएमटी राजधानी एक्स्प्रेस दुपारी ३.४५ वाजता सुटेल.

Web Title: The possibility of running the first capital on the Central Railway from January 19th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे