नवीन शैक्षणिक वर्षासाठी सप्टेंबर उजाडण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 05:32 AM2020-04-26T05:32:42+5:302020-04-26T05:32:55+5:30

अन्यथा ऑफलाइन परीक्षांसाठी लॉकडाउन संपण्याची वाट पाहा, त्यानंतरच परीक्षा निश्चिती करा अशी शिफारस यूजीसीने नेमलेल्या समितीने केल्या आहेत.

Possibility of September dawn for the new academic year | नवीन शैक्षणिक वर्षासाठी सप्टेंबर उजाडण्याची शक्यता

नवीन शैक्षणिक वर्षासाठी सप्टेंबर उजाडण्याची शक्यता

Next

मुंबई : महाविद्यालयीन व विद्यापीठातील परीक्षा पायाभूत सुविधा उपलब्ध असतील तरच घ्या, अन्यथा ऑफलाइन परीक्षांसाठी लॉकडाउन संपण्याची वाट पाहा, त्यानंतरच परीक्षा निश्चिती करा अशी शिफारस यूजीसीने नेमलेल्या समितीने केल्या आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षेसंदर्भात समिती नेमली असून या समितीने आपला अहवाल शुक्रवारी यूजीसीकडे सादर केला. त्याप्रमाणे देशभरातील महाविद्यालये व विद्यापीठांचे यंदाचे शैक्षणिक वर्ष नेहमीप्रमाणे जून-जुलैमध्ये सुरू होण्याऐवजी सप्टेंबरपर्यंत सुरू करावे, अशी शिफारस करण्यात आली आहे.
लॉकडाउनमुळे आॅनलाइन विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान, परीक्षा, आॅनलाइन अभ्यासक्रम याच्या अभ्यासासाठी यूजीसीने २ समित्यांची नेमणूक केली होती. महाविद्यालये व विद्यापीठांचे पुढील शैक्षणिक वेळापत्रक कसे असू शकेल आणि या काळात परीक्षा घेण्यासंबंधी उपलब्ध पर्याय यांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. तर आॅनलाइन शिक्षणाचा दर्जा कसा असावा व तो कसा सुधारता येईल याचा अभ्यास दुसरी समिती करणार होती. या दोन्हो समित्यांनी त्यांचा अहवाल शुक्रवारी सादर केला. यंदाचे शैक्षणिक वर्ष सप्टेंबरमध्ये सुरू करावे अशी शिफारस एका समितीने केली, तर आवश्यक पायाभूत सुविधा असतील तरच आॅनलाइन परीक्षा घ्या, अन्यथा लॉकडाउननंतर आॅफलाइन परीक्षांच्या तारखा निश्चित करा अशी शिफारस दुसऱ्या समितीने केलीे.
या दोन्ही अहवालांचा अभ्यास करून देशातील महाविद्यालये आणि विद्यापीठे यांना अधिकृत मार्गदर्शक तत्त्चे जारी करण्यात येतील अशी माहिती मिळाली आहे.
>जेईई, नीटसारख्या प्रवेश
परीक्षा परिस्थिती पाहूनच
लॉकडाउनमुळे लांबणीवर पडलेल्या प्रवेश परीक्षा या नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यातील अडथळा ठरू शकतात. नीट, जेईईसारख्या प्रवेश परीक्षा जूनपर्यंत घेण्याचा मानस असला तरी देशातील व राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या सर्वांचा विचार करूनच आयोगाकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title: Possibility of September dawn for the new academic year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.