मुंबईत यंदा १८० ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 02:43 AM2019-06-11T02:43:44+5:302019-06-11T02:44:07+5:30

पाणी तुंबण्याची ठिकाणे कमी करण्यासाठी पालिकेने काही उपाययोजना हाती घेतल्या.

The possibility of water tumbling in 180 places in Mumbai this year | मुंबईत यंदा १८० ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता

मुंबईत यंदा १८० ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता

googlenewsNext

मुंबई : रस्ते व मेट्रो रेल्वेचे काम, अपूर्ण नालेसफाईमुळे यंदाच्या पावसाळ्यातही काही भागांमध्ये पाणी तुंबण्याची शक्यता आहे. गतवर्षी २२५ ठिकाणी पाणी तुंबले होते, यंदा हे प्रमाण कमी असेल, असा दावा महापालिका प्रशासन करीत आहे. तरीही १८० ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचण्याचा धोका कायम आहे.

पाणी तुंबण्याची ठिकाणे कमी करण्यासाठी पालिकेने काही उपाययोजना हाती घेतल्या. त्यानुसार पाणी तुंबण्याचे प्रमाण कमी होत असल्याचा दावा अधिकारी करीत आहेत. त्यातही सर्वाधिक १५ ठिकाणे माटुंगा येथील आहेत. तर मालाडमध्ये १२, भांडुपमध्ये १२, मुलुंड ११, घाटकोपर ११, कुलाबा १०, वांद्रे पश्चिम १०, चेंबूर व मानखुर्द ११, वरळी ९, दादर ७, चेंबूर पूर्व येथे आठ ठिकाणे आहेत.

पाणी तुंबण्याची ठिकाणे...
कुलाबा
गणेशमूर्तीनगर, गीतानगर, आंबेडकरनगर

माटुंगा
खोदादाद सर्कल दादर टीटी, हिंदमाता, कोरबा मिठागर, भीमवाडी वडाळा, रेनॉल्ड्स कॉलनी, शिवशक्तीनगर, वच्छराजनगर, सुब्रमण्यम रोड, मुख्याध्यापक भवन, चुनाभट्टी बसडेपो, प्रतीक्षानगर समाजमंदिर हॉल, हेमंत मांजरेकर मार्ग, गांधी मार्केट-किंग्ज सर्कल

मालाड
मार्वे क्वीन परिसर, गंगाबावडी नंबर १, लोटस इमारत, मालाड सबवे, पाटकरवाडी, मंचूभाई रोड, पुष्पा पार्क, नाडियादवाला चाळ, पारस अपार्टमेंट, लगून रोड
घाटकोपर
१५१ न्यू पंतनगर, पोलीस वसाहत, नारायणनगर, देवकाबाई चाळ, गौरीशंकरवाडी, हरीपाडा कादरी चाळ, विद्याविहार स्टेशन, घाटकोपर स्टेशन, लक्ष्मीनगर म्हाडा कॉलनी.

चेंबूर
सोमय्या नाला, सुभाषनगर, शिवाजीनगर, देवनार नाला, मानखुर्द पीएमजी नाला, महाराष्ट्रनगर, बुद्धनगर, रिफायनरी दक्षिण, विजयनगर, नवजीवन सोसायटी, इंदिरानगर वाशीनाका, स्वस्तिक चेंबर, सुमननगर, पोस्टल कॉलनी रोड

भांडुप
मोरारजीनगर, पाइपलाइन सबवे, चंदन रुग्णालय, टँक रोड, हरिश्चंद्र खोपकर मार्ग, पाटीलवाडी, भांडुप स्टेशन, उषानगर पोलीस चौकी, गांधीनगर, विक्रोळी रेल्वे स्टेशन परिसर, श्रीरामपाडा, उदयश्री सोयायटी

मुलुंड
एस.एल. रोड, जव्हेर रोड जंक्शन, रणजीत सोसायटी, शांती कॅम्पस, हिरानगर, भगवती सोसायटी, जमुना सोसायटी, केळकर कॉलेज, एलआयसी कॉलनी, शीतल दर्शन, साहनी कॉलनी, नवघर रोड.
वांद्रे पश्चिम
एस.व्ही. रोड रेल्वे कॉलनी, जयभारत सोसायटी, नॅशनल कॉलेज, अल्मेडा पार्क ६वा आणि १० वा रोड, रेक्लेमेशन, खार सबवे

Web Title: The possibility of water tumbling in 180 places in Mumbai this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.