अनेक नगरसेवकांचे पद धोक्यात

By admin | Published: September 2, 2014 02:20 AM2014-09-02T02:20:53+5:302014-09-02T02:20:53+5:30

शासनाच्या अध्यादेशानंतरही शहरात 3 हजारांपेक्षा जास्त अवैध बांधकामे उभी राहिली असून, पालिकेने 675 जणांवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

The post of many corporators is in danger | अनेक नगरसेवकांचे पद धोक्यात

अनेक नगरसेवकांचे पद धोक्यात

Next
सदानंद नाईक - उल्हासनगर
शासनाच्या अध्यादेशानंतरही शहरात 3 हजारांपेक्षा जास्त अवैध बांधकामे उभी राहिली असून, पालिकेने 675 जणांवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. नगरसेवकच अवैध बांधकामे करीत असल्याचा आरोप महासभेत होताच आयुक्तांनी त्यांची नावे मागवून तथ्य असल्यास त्यांचे पद रद्द करण्याची शिफारस शासनाला करण्याचे ठरविले आहे. ज्यामुळे  त्यांच्या नगरसेवक पदावर गदा येण्याची शक्यता आहे. 
महापालिका अधिकारी व नगरसेवकांच्या संगनमताने अवैध बांधकामे होत असल्याचा आरोप-प्रत्यारोप आतार्पयत अप्रत्यक्ष होत होता.  मात्र गेल्या महासभेत नगरसेवकच अवैध बांधकामे करीत असल्याचा आरोप काही नगरसेवकांनी केल्याने, नगरसेवक वादात सापडले आहेत. अवैध बांधकामाच्या चर्चेत सहभागी झालेले नगरसेवक सुभाष मनसुलकर, सुरेश जाधव, भगवान भालेराव, बी.बी. मोरे, जीवन इदनानी, राजेंद्रसिंग भुल्लर, रमेश चव्हाण आदींनी अवैध बांधकाम माफियावर हल्ला चढवून, त्याविरोधात पाडकाम कारवाईची मागणी केली आहे.  
महापालिकेचे क्षेत्रफळ जेमतेम 13 कि.मी. तर लोकसंख्या 8 ते 9 लाखांपेक्षा जास्त आहे.  शहरातील 7क् टक्के जागा केंद्र व राज्य शासनाच्या ताब्यात असल्याचा फायदा उठवित, भूमाफिया व स्थानिक गुंडांसह स्थानिक नेत्यांनी बोगस सनदेवर आरक्षित भूखंड हडप केले आहेत.  राज्य शासनाच्या अध्यादेशानंतरही  गेल्या 7 वर्षात फक्त 1क्क् बांधकामेच नियमित होऊन हजारो प्रस्ताव शासन-पालिका दरबारी पडून आहेत.  शहरात 11क् बांधकाम परवान्यांचा प्रश्नही ऐरणीवर आला असून, पालिका आयुक्तांनी 12 वास्तुविशारदांसह अभियंत्यांची सनद कायमची रद्द केली आहे. 
 
1अवैध बांधकामे नगरसेवकच करीत असल्याचा आरोप पालिका महासभेत झाल्याने, आयुक्तांनी अशा नगरसेवकांची नावे सांगण्याची विनंती केली आहे. बांधकामात सहभागी असलेल्या नगरसेवकांची पदे रद्द करण्याचा अहवाल शासन दरबारी पाठविण्याचे आश्वासनही आयुक्तांनी या वेळी दिले आहे.  नगरसेवक पदावर गदा येऊ नये, म्हणून काही नगरसेवक आयुक्तांसोबत पिंगा घालत असल्याचे चित्र पालिकेत आहे. 
 
2अवैध बांधकामाच्या साखळीत नगरसेवक, भूमाफिया, पालिका मुकादम, बीट निरीक्षक, प्रभाग अधिकारी गुंतल्याची चर्चा पालिका वतरुळात होत आहे.  गेल्या पाच वर्षात 3 हजारांपेक्षा जास्त अवैध बांधकामांवर पाडकाम कारवाई होऊन 675 जणांवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत.  तसेच अवैध बांधकाम पाडकाम कारवाईसाठी विशेष पथकाची स्थापना गेल्या वर्षी केली होती. मात्र पथकाच्या अधिका:यांसह कर्मचा:यांना मारहाण झाल्याने, विशेष पथक दिसेनासे झाले होते. आता नगरसेवकांच्या मागणीनुसार पुन्हा विशेष पथकाची घोषणा आयुक्तांनी केली आहे.

 

Web Title: The post of many corporators is in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.