मुरूड : मुरूड येथील नवाबकालीन टपाल कार्यालयाची स्थापना १९२५ साली करण्यात आली. दरबार रोडवर सुमारे ८०० चौ.मीटर क्षेत्रात असलेले टपाल कार्यालय ‘हेरिटेज’ वाटावे. नुकताच ९ आॅक्टोबर ते १५ आॅक्टोबर हा टपाल सप्ताह विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांतून साजरा करण्यात आला. तथापि २ संगणक संचासह जनरेटर सेट व सोलर सिस्टीम बंद असल्यामुळे ग्राहक सेवेवर परिणाम होत आहे. विद्युत पुरवठा वरचेवर खंडित होत असल्यामुळे ई-पेमेंट सेवा पुरविणे खात्याला अवघड जात आहे.वस्तुत: बँकिंग क्षेत्रात पोस्ट खात्याला ‘सुप्त अवस्थेतील सिंह’ म्हटले जाते. भारत हा खंडप्राय देश असून खेड्यापाड्यात वसलेला आहे. २१व्या शतकात इंटरनेटच्या क्रांतीमुळे जग अधिक जवळ येवू पाहते आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात नेटच्या मोहजाळामुळे पत्रांचा वापर नगण्य आहे. टपाल खात्याचे अस्तित्वही टिकून रहावे म्हणून टपाल खातेही त्या दृष्टीने प्रयत्नशील दिसते. ई-मनिआॅर्डर, मोबाइल मनिआॅर्डर, इलेक्ट्रिक पी.बी.एफ., न्यू पेन्शन योजना, पोस्ट विमा आदि सेवा पुरविल्या जातात. (वार्ताहर)
टपाल कार्यालयात सुविधांची वानवा
By admin | Published: October 22, 2014 10:20 PM