पद गेले तरी पत कायम
By admin | Published: February 4, 2017 04:25 AM2017-02-04T04:25:11+5:302017-02-04T04:25:11+5:30
आरक्षणात बाद झालेल्या नगरसेवक पतीचे राजकीय करिअर वाचवण्यासाठी त्यांच्या पत्नी मैदानात उरतल्या आहेत. इच्छुकांनी आधीच नाकात दम आणला असताना
मुंबई : आरक्षणात बाद झालेल्या नगरसेवक पतीचे राजकीय करिअर वाचवण्यासाठी त्यांच्या पत्नी मैदानात उरतल्या आहेत. इच्छुकांनी आधीच नाकात दम आणला असताना काही नगरसेवकांनी दबावतंत्र वापरून आपल्या पत्नीसाठी ति िकट मिळवले आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांचे पद गेले तरी पत कायम राहणार आहे.
अनेक दिग्ग्जांची राजकीय कारकीर्द आरक्षणामुळे संपली आहे. याचा फटका नगरसेवका एवढाच त्या त्या पक्षालाही बसला आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या पत्नीला उमेदवारी देऊन आरक्षणातून पळवाट शोधली. मात्र यामुळे प्रत्येक निवडणुकीत आपल्याच घरात उमेदवारी राहील, असा हट्ट नगरसेवक धरू लागले. त्यामुळे बंडखोरीच्या भीतीने पक्षही विद्यमान नगरसेवकांचा हा हट्ट पुरवायला लागले. प्रत्येक पक्षाने घराणेशाहीला झुकते माप दिले आहे. यामध्ये बहुतांशी नगरसेवकांनी आपल्या पत्नीची वर्णी लावली असून काहींनी आपल्या मुलांसाठी तिकिट मिळवले आहे. त्यामुळे आपली ही सीट जिंकून आणून आपले राजकीय कारकीर्द वाचवण्यासाठी नगरसेवक कामाला लागले आहेत.
मेहर मोहसीन हैदर, सोनम मनोज जामसूतकर, स्वप्ना संदीप देशपांडे, स्नेहल सुधीर जाधव, रूक्मिणी विठ्ठल खरटमोल, संगीता ग्यानमूर्ती शर्मा, सािरका मंगेश पवार, भारती धनंजय पिसाळ, बबलू पांचाळ व नगरसेवक नाना आंबोले यांनी भाजपात प्रवेश करत आपल्या पत्नीसाठी उमेदवारी मिळवली. आरती बबलू पांचाळ आणि तेजस्वीनी नाना आंबोले, ज्योती पराग अळवणी यांना पुन्हा उमेदवारी मिळाली. (प्रतिनिधी)