मोबाइल टपाल कार्यालयाच्या माध्यमातून मुंबईकरांना टपाल सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 07:05 PM2020-04-03T19:05:44+5:302020-04-03T19:06:32+5:30

कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत असला तरी मुंबईतील टपाल विभागाचे काम लॉकडाऊनच्या परिस्थितीत देखील सुरु आहे.

Postage service to Mumbai through mobile post office | मोबाइल टपाल कार्यालयाच्या माध्यमातून मुंबईकरांना टपाल सेवा

मोबाइल टपाल कार्यालयाच्या माध्यमातून मुंबईकरांना टपाल सेवा

Next

मुंबई : कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत असला तरी मुंबईतील टपाल विभागाचे काम लॉकडाऊनच्या परिस्थितीत देखील सुरु आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या निवृत्तीवेतनासाठी टपाल कार्यालयात यावे लागू नये यासाठी त्यांच्या घरी निवृत्ती वेतन पोचवण्याची सुविधा देण्यात आली आहे.  परिस्थिती कशीही असली तरी टपाल सेवा उपलब्ध करुन देणे या हेतूने हे काम केले जात आहे. याशिवाय,  मोबाइल टपाल कार्यालयांच्या माध्यमातून नागरिकांना टपाल सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सध्या धारावी सहित इतर ठिकाणी ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. 

नुकतेच,  कोरोनाची तपासणी करण्यासाठी आवश्यक असलेले वैद्यकीय कीट टपाल खात्याच्या द्वारे चैन्नई ते मुंबई व नंतर मुंबईतून जीपीओमधून पुण्याला पाठवण्यात आले.  हे पार्सल पाठवताना त्याची हाताळणी करताना सुरक्षिततेची योग्य ती काळजी घेण्यात आली होती.  हे पार्सल स्वच्छ करुन हाताळणी करताना सँनिटायझरचा योग्य व पुरेसा वापर करुन पुण्याला पाठवण्यात आले.  मुंबई विभागाच्या पोस्टमास्टर जनरल स्वाती पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील टपाल खात्याचे कामकाज सुरु आहे.  कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने ग्राहकांना कोणतीही अडचण उद्भवू नये याची काळजी घेतली जात असल्याचे पांडे यांनी स्पष्ट केले. लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या व जेवणाचे हाल होत असलेल्या सुमारे दोनशे गरीब,  गरजूंना टपाल खात्यातील अधिकारी,  कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने व पांडे यांच्या माध्यमातून दररोज दोन वेळ जेवण पुरवले जात आहे. 

मुंबई शहर व उपनगरातील काही ठराविक टपाल कार्यालयांमध्ये टपाल खात्याची पूर्ण सेवा उपलब्ध आहे. पोस्टमनच्या माध्यमातून इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची कामे केली जात आहेत. ग्राहकांना रोख रक्कम उपलब्ध करुन दिली जात आहे.  मुंबईतील टपाल खात्याच्या एटीएममध्ये पुरेशी रोकड राहावी यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे.

Web Title: Postage service to Mumbai through mobile post office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.