Join us

पाेस्टमन आणून देताे पैसा; याेजना माहीत आहे का?; अनेकजण घेत आहेत लाभा, जाणून घ्या...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2022 12:07 PM

गेल्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांत १ हजार ६०३ कोटी रुपयांचे ४८.१६ लाख आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार झाले आहेत.

- सचिन लुंगसेमुंबई : आपण कधी बँकेचे पासबुक विसरतो, कधी एटीएम कार्ड विसरतो, तर कधी पाकीट चोरीला जाते. नेमकी अशाच वेळी पैशांची गरज भासते. ही अडचण ओळखून पोस्टाने एक योजना आणली आहे. आधार क्रमांक आधारित  पेमेंट सिस्टीम अंतर्गत बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न असलेल्या व्यक्तिला हातांच्या ठशांच्या आधारे पोस्टातून किंवा पोस्टमनकडून दहा हजारांची रक्कम घेता येते. या योजनेच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांत १ हजार ६०३ कोटी रुपयांचे ४८.१६ लाख आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार झाले आहेत.

काय आहे योजना?

  • अडीअडचणीला पोस्टातून, पोस्टमनकडून पैसे घेता येतात.
  • आधारशी संलग्न बँकखाते असलेल्यांना सेवेचा लाभ घेता येतो.
  • खात्यातून पैसे काढणे, शिल्लक रकमेची चौकशी करता येते.

ठसे द्या, पैसे घ्या...

  • पैसे काढण्यासाठी ग्राहकाला हाताच्या बोटांचे ठसे द्यावे लागतात.
  • यासाठी ग्राहकाकडे आधार क्रमांक असणे गरजेचे असते. 
  • ग्राहकाला दिवसाला जास्तीत जास्त १० हजार रुपये काढता येतात.

पोस्टमन तसेच ग्रामीण डाक सेवकांमुळे ग्राहकांचे बँकांपर्यंत जाण्याचे श्रम वाचले आहेत. खऱ्या अर्थाने आपली बँक, आपल्या दारी याचा अनुभव येत आहे. एक राष्ट्र, एक बँक ही संकल्पना प्रत्यक्षात उतरण्याच्या मार्गातील हे एक मोठे पाऊल आहे.- वीणा आर. श्रीनिवास, मुख्य पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई

तीन वर्षांतील व्यवहारवर्ष     रक्कम     व्यवहार२०१९-२०     ६४.२९ कोटी    २.०१ लाख २०२०-२१     ६९३.३६ कोटी     २३.५२ लाख२०२१-२२     ६३५.५५ कोटी     १७.५९ लाख२०२२-२३     २०४.४४ कोटी     ५.०५ लाख

टॅग्स :पोस्ट ऑफिसमुंबई