रवी राणांनी शब्द मागे घेतले, पण बच्चू कडू म्हणतात, मै झुकेंगा नहीं...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 12:44 PM2022-11-01T12:44:22+5:302022-11-01T12:52:28+5:30

गेल्या काही दिवसापासून आमदार रवी राणा आणि प्रहारचे बच्चू कडू यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या वादाला पूर्णविराम मिळाल्याचे काल राणा यांनी जाहीर केले.

poster from MLA Bachchu Kadu's rally has gone viral on social media | रवी राणांनी शब्द मागे घेतले, पण बच्चू कडू म्हणतात, मै झुकेंगा नहीं...

रवी राणांनी शब्द मागे घेतले, पण बच्चू कडू म्हणतात, मै झुकेंगा नहीं...

googlenewsNext

मुंबई: गेल्या काही दिवसापासून आमदार रवी राणा आणि प्रहारचे बच्चू कडू यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या वादाला पूर्णविराम मिळाल्याचे काल राणा यांनी जाहीर केले. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा वाद मिटवल्याचे राणा यांनी सांगितले. 

यावर काल आमदार बच्चू कडू यांनी आज कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले. आज प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात बच्चू कडू कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. या मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे.

अमरावतीत आज प्रहार संघटनेचा मेळावा; बच्चू कडू काय भूमिका घेणार?

या मेळाव्यातील बच्चू कडू यांचे एक पोस्टर जोरदार चर्चेत आले आहे. या पोस्टरवर मैं झुकेगा नहीं, असं लिहिण्यात आले आहे. त्यामुळे आता पुन्हा आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात वाद पेटणार असल्याचे बोलले जात आहे.    

आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद मिटला! 

गेल्या काही दिवसापासून आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि आमदार बच्चू कडू यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या वादावर अखेर पडदा पडल्याचे आज आमदार रवी राणा यांनी जाहीर केले. काल रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार रवी राणा यांच्यात तब्बल तीन तास चर्चा झाली. आज आमदार रवी राणा यांनी पत्रकार परिषद घेत आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यासाठी वापरलेले शब्द पाठिमागे घेत असल्याचे जाहीर केले. 

"गेल्या आठ- दहा दिवसांपासून जो वाद सुरू होता त्या वादावर आज पडता पडला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्यात वर्षा बंगल्यावर तीन तास चर्चा झाली. आमच्यात जे मतभेद होते त्यावर चर्चा झाली. मी आणि आमदार बच्चू कडू सरकार सोबत आहोत, बोलता बोलता तोंडातून काही वाक्य निघाली असतील तर ते वाक्य परत घेत आहे. बच्चू कडूंनीही आपले शब्द परत घ्यावेत, असंही आमदार रवी राणा म्हणाले. 

Web Title: poster from MLA Bachchu Kadu's rally has gone viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.