शिक्षक, पदवीधरची निवडणूक पुढे ढकलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 07:04 AM2018-05-15T07:04:28+5:302018-05-15T07:04:28+5:30
नाशिक आणि मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघ व मुंबई आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेचे चार सदस्य निवडण्यासाठी आधी जाहीर केलेली ८ जूनची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.
मुंबई : नाशिक आणि मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघ व मुंबई आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेचे चार सदस्य निवडण्यासाठी आधी जाहीर केलेली ८ जूनची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. मतदानाची नवी तारीख नंतर जाहीर केली जाईल.
मंगळवारपासून उमेदवारी अर्ज स्वीकारणे सुरु होऊन ते २२ मेपर्यंत दाखल करता येणार होते. मात्र त्याच्या एक दिवस आधी आयोगाने निवडणूक पुढे ढकलली. परिणामी आचारसंहिताही संपुष्टात आली आहे. सध्या शाळांना उन्हाळी सुट्ट्या असल्याने मतदार बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे सुट्ट्या संपल्यानंतर मतदान घ्यावे, अशी विनंती शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी आयोगास केली होती. आ. कपिल पाटील यांच्यासह प्रा. अपूर्वा हिरे, डॉ. दीपक सावंत आणि निरंजन डावखरे यांची मुदत येत्या ७ जुलै रोजी संपणार आहे.