बिल्डरांच्या हितासाठी निर्णयाला स्थगिती: शेलार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 02:36 AM2020-12-16T02:36:27+5:302020-12-16T02:36:38+5:30

स्थगिती बिल्डरांना लाभ पोहोचविण्यासाठी देण्यात आली, असा आरोप भाजपचे सदस्य आशिष शेलार यांनी मंगळवारी विधानसभेत केला.

Postponement of decision in favor of builders alleges bjp leader ashish Shelar | बिल्डरांच्या हितासाठी निर्णयाला स्थगिती: शेलार

बिल्डरांच्या हितासाठी निर्णयाला स्थगिती: शेलार

Next

मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात क्लास दोनच्या मालमत्ता क्लास एकमध्ये आणून फ्री होल्ड करण्यात आल्या. हा निर्णय मुंबईतील ३५ हजार गृहनिर्माण संस्था व त्यातील २ लाख मध्यमवर्गीयांना फायदा व्हावा म्हणून घेण्यात आला होता. या निर्णयाला आघाडी सरकारने स्थगिती दिली. ही स्थगिती बिल्डरांना लाभ पोहोचविण्यासाठी देण्यात आली, असा आरोप भाजपचे सदस्य आशिष शेलार यांनी मंगळवारी विधानसभेत केला.

पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना ते म्हणाले की, ही स्थगिती का दिली? याचा शोध घेत जेव्हा मुंबई महापालिकेत जातो तेव्हा त्याचे खरे कारण सापडते. पालिकेने मुंबई उपनगरात पाच हजार बेडचे हॉस्पिटल उभारण्यासाठी एक्स्प्रेस ऑफ इंट्रेस्ट मागवण्यात आले तेव्हा दोन बिल्डर समोर आले. त्यामध्ये दिलीप शहा, आणि सुहास कन्स्ट्रक्शन यांचा समावेश होता. यातील एक बिल्डर राज्याच्या आजीमाजी मुख्यमंत्र्यांचा मित्र आहे. त्यांने सांगितलेला भूखंड हा क्लास दोनमध्ये होता तो क्लास एकमध्ये टाकून फ्री होल्ड आघाडी सरकारच्या काळात करण्यात आला. त्यामुळे त्या मालकाला आता तीसपट अधिकची किंमत मिळणार आहे. या बाबी उघड होऊ लागताच पालिकेने याप्रकरणी हात झटकले व हे एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट रद्द केले. पण याच निमित्ताने लीजवरील जागांचा निर्णय चर्चेत आला आणि आघाडी सरकारने संपूर्ण निर्णयाला स्थगिती दिली. वास्तविक हा निर्णय मध्यमवर्गीय माणसाच्या हितासाठी गृहनिर्माण संस्थांंसाठी झाला होता, त्याचा वापर भूखंडासाठी करून स्थगिती देण्यात आली, असा आरोप शेलार यांनी केला.

कोरोना काळात मुंबई महापालिकेने ज्या कंपन्यांकडून सॅनिटायझर घेतले त्यापैकी अनेक कंपन्या या स्टेशनरी पुरवठादार, घरगुती साधनांची दुरुस्ती करणाऱ्या, वैद्यकीय उपकरणे पुरवणाऱ्या असून यातील रेव्हणकर ट्रेंडर्स ही कंपनी ड्रम वाद्य तयार करणारी असून, या कंपन्याना सॅनिटायझर पुरविण्याचे काम देण्यात आले. या कंपनीचे संचालक रेव्हणकर हे मुंबईच्या महापौरांचे जावई आहेत. वरळीच्या कोविड सेंटरचे काम महापौरांच्या मुलाला देण्यात आले, असे शेलार म्हणाले. भाजपचे अमित साटम यांनीही कोरोना काळातील वैद्यकीय खरेदीतील कथित घोटाळ्यांवर प्रकाश टाकला.  

वेगळ्या कंपन्यांना दिले काम 
कोरोना काळात मुंबई महापालिकेने ज्या कंपन्यांकडून सॅनिटायझर घेतले त्यापैकी अनेक कंपन्या स्टेशनरी पुरवठादार,  करणाऱ्या, वैद्यकीय उपकरणे पुरवणाऱ्या असून यातील रेव्हणकर ट्रेंडर्स ही कंपनी ड्रम वाद्य तयार करणारी असून, या कंपन्याना सॅनिटायझर पुरविण्याचे काम देण्यात आले.

Web Title: Postponement of decision in favor of builders alleges bjp leader ashish Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.